Home > News > "भगवान भी मेहरबान था अच्छा बारीश हो गया" 'त्या' पावसा बद्दल सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

"भगवान भी मेहरबान था अच्छा बारीश हो गया" 'त्या' पावसा बद्दल सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

भगवान भी मेहरबान था अच्छा बारीश हो गया त्या पावसा बद्दल सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
X

आज काल बेस्ट ऑफ लक ऐवजी "पवरांसारख तसा पाऊस तुमच्या नशीबात येवो" असं मिश्कील पणे म्हटलं जात. असाच काहिसा मिश्कील पणा त्यांचीच कन्या सुप्रिया सुळे यांनी हवेली तालुक्यातील वाघोली येथे पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे उमेदार अरुण लाड व जयंत आसगावकर यांच्या प्रचारा सभेत दाखवला आहे.

"कुणाला वाटलं होतं.. भगवान भी मेहेरबान था अच्छा बारीश हो गया… पाऊस चांगला पडला म्हणजे पिकांसाठी तुम्हाला कुठला वाटला" सुप्रिया सुळे यांनी असं म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

दरम्यान, या मेळाव्या प्रसंगी सुळे यांनी मी स्वतः उमेदवार आहे असे समजून मतदान करण्याचे अहवान केले. तर शिरुर हवेलीचे आमदार म्हणजे 'सौ के बराबर एक' आहे म्हणून गौरवोद्गार काढले. तर यावेळी शिवसेच्या अनुपस्थिती बाबत बोलताना म्हणाल्या की "शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षला खोकला झाला आहे, त्यामुळे ते न आलेलेच बरे" असं देखील म्हटलं आहे.


Updated : 27 Nov 2020 4:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top