Home > Political > "खासदार निधी काढून घेऊन मोदीजी संसदेची नवी इमारत बनवीत आहेत"

"खासदार निधी काढून घेऊन मोदीजी संसदेची नवी इमारत बनवीत आहेत"

खासदार सुप्रिया सुळे यांनी खासदार निधी कपात मुद्द्या वरून साधला केंद्र सरकारवर निशाणा

खासदार निधी काढून घेऊन मोदीजी संसदेची नवी इमारत बनवीत आहेत
X

महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकांच्या नंतर आता राजकीय पक्षांनी आपले लक्ष महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांच्याकडे वळवले असून काल राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अंबरनाथ आणि बदलापूर येथे कार्यकर्ता संमेलनाच्या निमित्ताने आगामी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना खासदार निधी रद्द केल्याच्या प्रकरणी केंद्र सरकारवर निशाणा साधला

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, खासदारांकडे त्यांचा निधी हा त्यांच्या मतदार संघातील छोट्या मोठ्या कामासाठी फार महत्वाचा असतो, मात्र कोरोना काळात मोदी साहेबांनी अर्धा खासदार निधी घेतला, आम्ही काही बोललो नाही, देशावर संकट होते, मात्र आता खासदारांचा खासदार निधी काढून घेऊन मोदीजी संसदेची नवी इमारत बनवीत आहेत , हे एकदम चुकीचे आहे, आमचा निधी घेऊन जर त्यांनी प्रत्येक खासदारांच्या मतदार संघात एक हॉस्पिटल उभारले असते तर आम्ही आमचा सर्व खासदार फंड स्वखुशीने दिला असता याकार्यक्रमात गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव आणि इतर स्थानिक नेते उपस्थित होते.

Updated : 2021-02-22T11:21:59+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top