Home > News > अल्पवयीन तरुण- तरुणीची विषारी औषध घेऊन आत्महत्या ; प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय

अल्पवयीन तरुण- तरुणीची विषारी औषध घेऊन आत्महत्या ; प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय

अल्पवयीन तरुण- तरुणीची विषारी औषध घेऊन आत्महत्या ; प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय
X

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील कुंभारी गावातील अल्पवयीन तरुण व तरुणीने तासाभराच्या अंतराने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. दोघांनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत असल्याने त्या दृष्टीने तपास सुरू आहे. पवन जाधव (वय १७) व तानिया चव्हाण (वय १६) अशी मृत युवक व युवतीची नावे आहेत. कुंभार तांडा या गावातील तानिया चव्हाण या १६ वर्षीय अल्पवयीन युवतीने मंगळवारी घरात कोणी नसताना दुपारी विषारी औषध प्राशन करुन जीवन संपवलं. आई-वडील घरी आल्यानतंर सायंकाळी हा प्रकार समोर आला. या घटनेनंतर अवघ्या तासाभराच्या अंतराने गावातीलच १७ वर्षीय युवक पवन जाधव यानेही शेतात जावून विष प्राशन करुन आत्महत्या केली. युवकाचा मृतदेह शेतातच रात्रभर पडून होता.

मृत तरुण व तरुणीचे एकमेकांवर प्रेम होते अशी गावात चर्चा सुरू आहे. मात्र, त्यांनी आत्महत्या वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळाताच पोलिसांनी गावात जाऊन तपास केला. मुलाचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला आहे. या मुलीच्या मेहुण्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा मेसेज पवन याने त्याच्या काकाला पाठवला असल्याची माहिती समोर आल्याने ही आत्महत्या प्रेमप्रकरणातून झाली असल्याचा संशय व्यक्त होत आहे त्या दृष्टीने पोलीस अधिक तपास करत आहेत.

Updated : 12 Nov 2021 7:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top