Home > News > अशी 'कृती' सुद्धा बलात्कार ठरु शकते; 'उच्च न्यायालयाने' दिंडोशी सत्र न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा कायम ठेवली

अशी 'कृती' सुद्धा बलात्कार ठरु शकते; 'उच्च न्यायालयाने' दिंडोशी सत्र न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा कायम ठेवली

अशी कृती  सुद्धा बलात्कार ठरु शकते; उच्च न्यायालयाने दिंडोशी सत्र न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा कायम ठेवली
X

मुंबई: महिलेच्या खासगी भागाशी बलात्कारासारखी कृती करणे सुद्धा बलात्कारच असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला आरोपीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, या अपिलावरील सुनावणी करताना उच्च न्यायालयाने म्हंटले आहे.

पीडिता तिच्या घराजवळील मंदिरात गेली होती. तिथून आरोपीने तिला जत्रेत नेले. त्यानंतर त्याने जत्रेच्या ठिकाणालगत असलेल्या झाडीमध्ये पीडितेला नेले आणि तिच्या खासगी भागात बोट घातले. यानंतर मुलगी रडू लागल्याने त्याने तिला तिच्या घराजवळ सोडले. मुलीने आई-वडीलांना हकीकत सांगितल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यात आरोपीला सत्र न्यायालयाने बलात्कार आणि अपहरणप्रकरणी दोषी ठरवलं.

न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला आरोपीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, आपल्याला बलात्काराच्या आरोपाखाली नाही तर लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली शिक्षा होऊ शकते, असे आरोपीने अपिलात म्हटले आहे. 'मात्र रेकॉर्डवर असलेल्या पुराव्यांवरून असे सिद्ध होते की, आरोपीने पीडितेच्या खासगी भागात बोट घातले. त्याची ही कृती भारतीय दंड संहिता कलम ३७५ अंतर्गत करण्यात आलेल्या बलात्काराच्या व्याख्येत बसणारी असल्याचं, म्हणत उच्च न्यायालयाने दिंडोशी सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला कायम ठेवलं आहे.

Updated : 17 July 2021 6:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top