Home > News > देशभक्तीपर गाणी म्हणत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी साजरा केला स्वातंत्र्य दिन..

देशभक्तीपर गाणी म्हणत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी साजरा केला स्वातंत्र्य दिन..

देशभक्तीपर गाणी म्हणत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी साजरा केला स्वातंत्र्य दिन..
X

आज भारतीय स्वातंत्र्य लढ्याला पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. भारत इंग्रजांच्या जोखडात होता. याच इंग्रजांच्या जुलमी व्यवस्थेविरोधात मोठा स्वातंत्र्यलढा उभा राहिला आणि या स्वातंत्र्यलढ्यात हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी हसत हसत आपले प्राण दिले. आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात आज स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. अगदी दिल्लीपासून अनेक दुर्गम भागातील वड्या वस्त्यांवर स्वातंत्र्य दिन वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला गेला. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पारंबी या अत्यंत दुर्गम अशा गावात विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे. या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये असणाऱ्या मुला-मुलींनी शाळेत देशभक्तीपर गाणी म्हणत हा दिवस साजरा केला.

भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि आज या दिवसाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. 75 वर्षांपूर्वी इंग्रजांच्या विरोधात अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वजण पेटून उठले. इंग्रजांना हुसकावून लावण्यासाठी सर्वजण रस्त्यावर उतरले आणि या सर्वांच्या लढ्याला यश आलं भारत स्वतंत्र झाला. पण हा दिवस पाहण्यासाठी अनेक हुतात्मे शहीद झाले. खरंतर आजचा दिवस हा त्यांच्या सर्वांचे स्मरण करण्याचा दिवस. स्वातंत्र्यलढ्यात अनेक जण हसत हसत फासावर गेले तर कित्येकांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. पारंबी या गावातील जिल्हा परिषदेच्या मुलांनी आज त्यांच्या शाळेमध्ये जी देशभक्तीपर गाणी गायली त्या गाण्यांमधून या सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या शूर पराक्रमाला उजाळा मिळाला. खर तर या शाळेत आज पार पडलेल्या या आगळ्यावेगळ्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातून मुलामुलींना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्यांना अभिवादन केले...Updated : 15 Aug 2022 3:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top