Home > News > आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी मुख्यमंत्र्यांकडे विद्यार्थी करतायत 'हेलिकॉप्टर'ची मागणी

आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी मुख्यमंत्र्यांकडे विद्यार्थी करतायत 'हेलिकॉप्टर'ची मागणी

आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी मुख्यमंत्र्यांकडे विद्यार्थी करतायत हेलिकॉप्टरची मागणी
X

आरोग्य विभागाच्या परीक्षेत झालेला गोंधळ पाहता सरकारने गेल्यावेळी परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. मात्र दुसऱ्यांदा पुन्हा तोच गोंधळ पाहायला मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप असून, महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा टीका केली जात आहे.

24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना पहिल्या पेपरला एका जिल्ह्यात तर दुसऱ्या पेपरला दुसऱ्या जिल्ह्यात सेंटर देण्यात आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून ठाकरे सरकारवर मोठ्याप्रमाणात टीका होतांना पाहायला मिळत आहे.

ट्विटवर विशाल नावाच्या व्यक्तीने ट्विट करत लिहलं आहे की," प्रिय मुख्यमंत्री साहेब,तुम्ही जे फोटो काढण्यासाठी हेलिकॉप्टर वापरले होतेते एक दिवसासाठी भाड्याने मिळावे,..राजेश टोपे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मला एकाच वेळी दोन पेपर द्यायचे,असं म्हंटले आहे.

औरंगाबाद येथील अश्वनी गुंजाळ नावाच्या मुलीचं पहिले सेंटर औरंगाबाद यर दुसऱ्या पेपरचं सेंटर पुणे देण्यात आलं आहे. त्यामुळे अवघ्या तीन तासांत पुणे जाऊन सेंटरवर पोहचणे कसं शक्य होणार असा प्रश्न अश्वनी यांना पडला आहे. विशेष म्हणजे सेंटरवर एक तास आधी पोहचायचं असल्याने अवघे दोन तासांत औरंगाबाद ते पुणे जाणं शक्य नसल्याने अश्वनी यांना एक पेपर देता येणार नाही.

अशीच परिस्थिती अनेक विद्यार्थ्यांची झाली आहे. गेल्या वेळी अशाच गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ सरकारवर आली होती. मात्र एक महिन्यांचा वेळ मिळूनही आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ मात्र कायम आहे.

Updated : 17 Oct 2021 2:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top