Home > News > बालकांवर अघोरी उपचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई : यशोमती ठाकूर

बालकांवर अघोरी उपचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई : यशोमती ठाकूर

मेळघाटात सातत्यपूर्ण जाणीव जागृती कार्यक्रम राबविण्याचे निर्देश यशोमती ठाकूर यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत

बालकांवर अघोरी उपचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई : यशोमती ठाकूर
X

अमरावती: मेळघाटातील बालकाच्या पोटावर चटके देऊन उपचार करण्याचा अघोरी प्रकार समोर आला असून, याप्रकरणी अघोरी उपचार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहे.

चिखलदरा तालुक्यातील खटकाली येथील राजरत्न जामुनकर हा ३ वर्षीय बालक आठवडाभरापासुन आजारी होता.त्यामुळे आई-वडिलांनी परतवाडा परिसरात कामानिमीत्ताने असताना सुरवातीला मुलावर धामणगाव येथील खाजगी डाॅक्टराकडे औषधोपचार केले. मात्र,प्रकृतीत सुधारणा न झाल्याने या कुटूंबाने मुलाला भगतबाबाकडे नेले.

या बाबाने उपचाऱ्याच्या नावाखाली कोवळ्या निरागस बालकाच्या पोटावर डागण्या दिल्या. त्यामुळे मुलाला जखमा झाल्या आहे. या बालकावर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री ठाकूर यांनी इर्विन रुग्णालयाकडे धाव घेतली व बालकाच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी डॉक्टर व बालकाच्या आईवडलांशी संवाद साधला.



अघोरी उपचार रोखा, जाणीव जागृती करा

याप्रकरणी जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा. त्याचप्रमाणे,आरोग्य शिक्षणाच्या बाबतीत मेळघाटात भरीव जाणीवजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी भोंदू बाबांवर कारवाई करतानाच पाड्यापाड्यावर आरोग्य यंत्रणेद्वारा कार्यक्रम राबवावेत, असे निर्देशही यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.

Updated : 4 Jun 2021 8:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top