Home > News > दोन लाख रुपये किमतीचा गर्भपात आणि गुंगीच्या औषधांचा साठा जप्त

दोन लाख रुपये किमतीचा गर्भपात आणि गुंगीच्या औषधांचा साठा जप्त

अन्न आणि औषध प्रशासन आणि पोलिसांच्या सयुक्त पथकाने कारवाई करत मुद्देमाल जप्त केलाय.

दोन लाख रुपये किमतीचा गर्भपात आणि गुंगीच्या औषधांचा साठा जप्त
X

२ लाख रुपये किमतीचा गर्भपात आणि गुंगीच्या औषधांचा साठा अन्न आणि औषध प्रशासनाने जप्त केलाय. जालन्यातील अंबड तालुक्यातील पारनेर फाटयाजवळ ही कारवाई करण्यात आली. या कारवाईने जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहंमद शोहेब, मोहम्मद आसिफ असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव असून ते बुलडाणा जिल्हयातील चिखली शहरातील रहिवासी आहे. पारनेर फाटा येथे दोन तरुण गर्भपात आणि गुंगीच्या औषधांचा साठा विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहितीवरून या विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांची मदत घेऊन सापळा रचला.

यावेळी संशियत दोघा तरुणांना ताब्यात घेत विचारपुस केली असता, संबधित औषधसाठा बाळगण्यासंदर्भातील कोणाताही परवाना या युवकांकडे नसल्याचं समोर आलं. दरम्यान अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने या युवकांना ताब्यात घेत औषधांचा साठा जप्त केला अशी माहिती अन्न आणि औषधी प्रशासन विभागाच्या निरीक्षक अंजली मिटकर यांनी दिली. दरम्यान अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे

Updated : 27 July 2021 12:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top