Home > News > यंदाच्या वारीत राज्य महिला आयोग राबवणार आरोग्य वारी संकल्पना

यंदाच्या वारीत राज्य महिला आयोग राबवणार आरोग्य वारी संकल्पना

यंदाच्या वारीत राज्य महिला आयोग राबवणार आरोग्य वारी संकल्पना
X

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दि.२२ जून रोजी पुण्यात येत असून पुणे पोलिसांनी बंदोबस्ताची चोख आखणी केली आहे. तब्बल चार हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्षे वारी होऊ शकली नाही. त्यामुळे यंदा वारी सोहळ्यात विक्रमी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता पालखी आगमनापासून ते प्रस्थानापर्यंत पोलिसांनी बंदोबस्ताची कडेकोट तयारी केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक स्वतः बंदोबस्ताच्या प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवून आहेत.

दोन्ही पालख्यांचे २२ जूनला पुण्यात आगमन होणार असून २२ व २३ जून रोजी पुण्यात मुक्कामी असणार आहेत. दोन्ही पालख्या नियोजनानुसार भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर व नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिर येथे मुक्कामी असणार आहेत. याठिकाणीदेखील पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे.

पालखी सोहळ्यात दर्शनासाठी होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा सोनसाखळी चोरटे, मोबाईल चोरटे घेत असतात. हे गैरप्रकार रोखण्यासाठी ठिकठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची गस्त असणार आहे. विशेषतः मुक्कामाच्या ठिकाणी पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. महिलांचा देखील पालखी सोहळ्यात मोठा सहभाग असतो. त्यामुळे साध्या वेशातील महिला पोलीस कर्मचारी त्याचबरोबर दामिनी मार्शलची पथके गस्तीवर ठेवण्यात आली आहेत. तसेच गुन्हे शाखेची पथकेही साध्या वेशात गस्त घालणार आहेत.



काय असणार या आरोग्य वारी संकल्पनेत..

- वारकऱ्यांसाठी हेल्पलाईन, ठिकठिकाणी मदतीसाठी बुथ

- वॉच टॉवर उभारून त्याद्वारे खडा पहारा

- गर्दीच्या ठिकाणी बॅरिकेड्स

- पालखी मार्गावर आवश्यक तेथे सीसीटीव्ही यंत्रणा

- साध्या वेशातील पोलिसांची गस्त

- वाहतूक शाखेचा स्वतंत्र बंदोबस्त

- अन्न औषध प्रशासनाकडून वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थाची तपासणी

- पालखी सोहळा मार्गावर मौल्यवान वस्तू व सुरक्षिततेच्या सूचना देणारे फलक

- मार्गालगतच्या गल्ली-बोळात पोलिसांचे मोटारसायकल पेट्रोलिंग

- वैद्यकीय सुविधेबरोबर रुग्णवाहिकेची व्यवस्था

Updated : 19 Jun 2022 4:05 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top