Home > News > सुप्रिया सुळेंबाबत केलेलं वक्तव्य चंद्रकांत पाटलांना पडलं महागात..

सुप्रिया सुळेंबाबत केलेलं वक्तव्य चंद्रकांत पाटलांना पडलं महागात..

सुप्रिया सुळेंबाबत केलेलं वक्तव्य चंद्रकांत पाटलांना पडलं महागात..
X

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले. आणि त्या वक्तव्यवरून त्यांना चांगलाच टीकेचा सामना करावा लागला. आता या प्रकरणावरून राज्य महिला आयोगाने त्यांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना सुप्रिया सुळेंबद्दल केलेलं वक्तव्य चांगलंच महागात पडलं आहे.

राज्य महिला आयोगाने चंद्रकांतदादा पाटील यांना पाठवलेल्या नोटीस मध्ये म्हंटल आहे की, पुणे शहर लीगल सेलचे Adv. असीम सरोदे व सहकारी यांनी राज्य महिला आयोगास निवेदन देण्यात आले असून. त्यानुसार चंद्रकांत पाटील यांना लेखी खुलासा मागण्यात आला आहे. ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या वेळी पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य महिला आयोगास तक्रार अर्ज मिळाला असून आपल्या सारख्या लोकप्रधिनिधींकडून असे वक्तव्य होणे खेदाची बाब आहे असं म्हणत यापुढे महिलांचा सन्मान राखला जाईल याचे भान चंद्रकांत पाटील यांनी राखावे. तसेच केलेल्या वक्तव्याबाबत लेखी खुलासा राज्य महिला आयोगास सादर करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले आहेत.

चंद्रकांतदादा पाटील यांना पाठवलेल्या नोटीस मध्ये काय म्हंटल आहे..

ओबीसी आरक्षण आंदोलनासमयी पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोगास तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. महिला आज स्वकर्तुत्वावर शिक्षण, व्यवसाय, समाजकारण व राजकारणासह सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य समस्थ महिला वर्गाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचविणारे आहे. एका लोकप्रतिनिधीकडून असे वक्तव्य होणे ही खेदाची बाब आहे. यापुढे महिलांचा सन्मान राखला जाईल याचे भान चंद्रकांत पाटील यांनी राखावे. तसेच केलेल्या वक्तव्याबाबत लेखी खुलासा राज्य महिला आयोगास सादर करण्याबाबतचे निर्देश चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलेले आहेत.

Updated : 27 May 2022 12:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top