Home > News > महिला पोलिसांना आता आठ तास ड्युटी - राज्य सरकारचा निर्णय

महिला पोलिसांना आता आठ तास ड्युटी - राज्य सरकारचा निर्णय

महिला पोलिसांना आता बारा ऐवजी आठ तास ड्युटी असणार आहे.

महिला पोलिसांना आता आठ तास  ड्युटी - राज्य सरकारचा निर्णय
X

महाराष्ट्र सरकारने आज महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या या निर्णयानुसार आता महिला पोलीस कर्मचाऱ्यांना पूर्वी जे 12 तास काम करावे लागत होते ते आता 8 तास करण्यात आले आहेत. त्यामुळे आता राज्यातील महिला पोलिसांच्या कामाची वेळ ही आठ तास असणार आहेत.

ह्या निर्णयाचे स्वागत करणारे ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांची ड्युटी 12 तसा वरून आठ तास करण्याचा निर्णय घेतला. हा अतिशय चांगला निर्णय असून त्यामुळे अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम ताळमेळ साधता येणे शक्य होणार आहे. या निर्णयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मनापासून आभार अस म्हंटल आहे.

Updated : 24 Sep 2021 12:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top