Latest News
Home > News > छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ वादाच्या भोवऱ्यात

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ वादाच्या भोवऱ्यात

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ वादाच्या भोवऱ्यात
X

स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत तिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शिवप्रेमींनी या व्हिडीओवर आक्षेप घेत अग्रिमा जोशुआवर टीका केली आहे.

एका शोमध्ये अग्रिमा जोशुआने मुंबईत अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. यात तिने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. म्हणून शिवप्रेमीमध्ये संतापाची लाट उसळली असून तिच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

अग्रिमा जोशुआ या शोमध्ये काय म्हणाली ?

‘शिवाजी पुतळ्यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मी इंटरनेटवर सर्च केलं. मला एक कोणीतरी लिहिलेला भलामोठा निबंध सापडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी शिवाजी पुतळा मास्ट्ररस्ट्रोक आहे… यामुळं महाराष्ट्रात त्यांची सत्ता येईल… तर दुसऱ्या एकाला वाटलं क्रिएटिव्हिटी कॉंन्सेंट आहे, त्यानं लिहिलं की, यात जीपीएस ट्रेकरसुद्धा असणार शिवाय त्यांच्या डोळ्यात लेझर लाईट निघेल जी अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर नजर ठेवेल. तर तिसऱ्या एका व्यक्तीनं शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा, असं लिहिलं होतं… बस्स मी त्यालाच फॉलो केलं’, असं तिनं तिच्या शोमध्ये म्हटलं आहे.

रमेश सोलंकी यांनी लोकांच्या भावना अग्रिमा जोशुआच्या स्टँड-अप कॉमेडीनं दुखावल्या असून तिच्याविरोधात कडक कारवाई करावी असी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबई पोलीस आयुक्त यांना ट्विटरवरुन केली आहे.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्टँडअप काॅमेडीच स्टेजचं फोडलं..

Updated : 11 July 2020 4:46 AM GMT
Next Story
Share it
Top