Home > News > आमदार होण्यासाठी पांढऱ्या पायाच्या बायकोला सोड सांगणारा आध्यात्मिक गुरू पोलिसांच्या ताब्यात

आमदार होण्यासाठी पांढऱ्या पायाच्या बायकोला सोड सांगणारा आध्यात्मिक गुरू पोलिसांच्या ताब्यात

आमदार होण्यासाठी पांढऱ्या पायाच्या बायकोला सोड सांगणारा आध्यात्मिक गुरू पोलिसांच्या ताब्यात
X

पुणे: आमदार,मंत्री होण्यासाठी तुला आधी तुझ्या पांढऱ्या पायाच्या बायकोला सोडचिठ्ठी द्यावी लागेल. तिचे ग्रहमान दूषित झाले आहे. जर तुझी ही बायको म्हणून कायम राहिली तर तू राजकारणात मोठा होणार नाही, असे सांगून प्रतिष्ठित कुटुंबाला सुनेचा छळ करायला प्रवृत्त केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी आध्यात्मिक गुरूला अटक केली आहे.

शेकडो भक्त असलेल्या रघुनाथ राजाराम येमूल असे या आध्यात्मिक गुरूचे नाव आहे. एका महिलेने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली ज्यात 8 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरु असताना ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हंटल आहे की, पिडीत महिलेच्या बेडरूमच्या बाहेर एक दिवस हळदी-कुंकू लावलेल्या टाचण्या मारलेला लिंबू एका पिशवीमध्ये आढळून आल्या. त्यामुळे त्यांनी आपल्या पतीला याबाबत विचारले असता, 'रघुनाथ येमूल हे माझे गुरू आहेत व त्यांनी तू अवदसा असून, पांढऱ्या पायगुणाची असल्याचं सांगितले आहे.

तसेच तुझा जन्मवेळ चुकीची आहे. त्यामुळे सर्व ग्रहमान दूषित झाले आहे. जर तू माझी बायको म्हणून अशीच कायम राहिली तर मी आमदार ही होणार नाही व मंत्रीही होणार नाहीस. त्यामुळे तुला लवकरात लवकर सोडचिठ्ठी देऊन तुझ्याकडून मुलगाही काढून घे आणि मी देतो हे लिंबू उतरविल्याने तुझ्या मागची ही पीडा कायमची निघून जाईल, असे रघुनाथ येमूल म्हणाले असल्याचं पिडीतिच्या पतीने तिला सांगितलं.

Updated : 12 July 2021 5:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top