"कोण हिकडं फिरकत बी नाय मेल्यात का जगल्याती बघाय" पुण्यातील पुरग्रस्त महिलांच्या व्यथा
X
"परत्येक टायमाला आमची भंडी व्हाऊन जातात खायचं व्हाऊन तातय.. आणि त्याच पाण्यातून आम्हाला पळावं तागतय.. कोण हिकडं फिरकत बी न्हाय मेल्यात का जगल्यात का वाचल्याती कोणी बघाय येत न्हाय हिकडं" ही व्यथा आहे पुण्यातील आंबिल ओढ भागात रहाणाऱ्या महिलांची. इथल्या महिलांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे."कोण हिकडं फिरकत बी नाय मेल्यात का जगल्याती बघाय" पुण्यातील पुरग्रस्त महिलांच्या व्यथा
इथं राहणाऱ्या लोकांनी अर्धी घर पाण्याने भरली होती. त्यामुळे घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू, धान्य आणि अन्य समानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या इथल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात खाण्याचे हाल झाले आहेत. मात्र याची "स्थानिक लोकप्रतिनिधींना काही पडलेलं नाही." असं इथल्या स्थानिक महिला सांगतात. त्यातच लॉकडाउनकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने आता पुढं काय? असा प्रश्न महिलां विचारतात.