Home > News > शेतकरी आंदोलन: आत्तापर्यंतचं सर्वात अहंकारी सरकार- सोनिया गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

शेतकरी आंदोलन: आत्तापर्यंतचं सर्वात अहंकारी सरकार- सोनिया गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारला सोनिया गांधींनी घेरले, सरकारला करून दिली राजधर्माची आठवण... आत्तापर्यंतचं सर्वात अहंकारी सरकार वाचा काय म्हटलंय सोनिया गांधी यांनी...

शेतकरी आंदोलन: आत्तापर्यंतचं सर्वात अहंकारी सरकार- सोनिया गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
X

गेल्या महिन्याभरापासून दिल्लीच्या सीमांवर लाखो शेतकरी मोदी सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्या विरोधात आंदोलन करत आहे. मात्र, मोदी सरकार अजुनही या कायद्याबाबत कोणताही तोडगा काढू शकलेले नाही. यावरून कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकार वर जोरदार निशाणा साधला आहे.

सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला राजधर्माची आठवण करून दिली आहे. ज्या शेतकऱ्यांचा आंदोलनात मृत्यू झाला आहे. त्या शेतकऱ्यांना सोनिया गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मोदी सरकारने सत्तेचा अहंकार बाजूला ठेऊन तात्काळ कृषी कायदे कोणत्याही अटीशर्तींविना मागे घ्यायला हवेत. शेतकरी कडाक्याच्या थंडीत आणि पावसात आंदोलनाला बसले आहेत. कृषी कायदे मागे घेतले गेले तर आंदोलन थांबेल. कायदे मागे घेणे हाच राजधर्म असेल. असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

या सरकारचे 'थकाओ आणि भगाओ' नीती समोर शेतकरी हार मानणार नाहीत. आंदोलन प्रदीर्घ काळ सुरू ठेऊन आंदोलकांना थकवून टाकण्याचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत. लोकशाहीत जनतेच्या भावनांकडे फार काळ दुर्लक्ष करून चालत नाही. हे सरकार आणि सरकारमधल्या नेत्यांना समजायला हवं. असं म्हणत हे कायदे तात्काळ रद्द करण्याची मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे.

'मुट भर उद्योगपतींसाठी नफा निश्चित करण्याचं कामच या सरकारचा अजेंडा राहिलेला आहे.'

काळे कायदे मागे घ्या म्हणताना सोनिया गांधींनी आरोप पुन्हा आरोप केला की हे कायदे शेती आणि शेतकऱ्यांना यांना बर्बाद करतील. काँग्रेस या काळ्या कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या पूर्ण समर्थनात आहे.आतापर्यंत शेतकरी आंदोलनामध्ये 50 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे.

Updated : 4 Jan 2021 8:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top