Home > News > ''हे काय करून बसलास मित्रा..'' नितीन देसाईंच्या जाण्याने सिनेसृष्टी हळहळली

''हे काय करून बसलास मित्रा..'' नितीन देसाईंच्या जाण्याने सिनेसृष्टी हळहळली

हे काय करून बसलास मित्रा.. नितीन देसाईंच्या जाण्याने सिनेसृष्टी हळहळली
X

काल सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृत्यूची बातमी समोर आली आणि संपूर्ण कलाविश्व हादरून गेलं. वयाच्या 58 व्या वर्षीच त्यांनी आपलं जीवन संपवलं. त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली. नितीन देसाई यांच्या जाण्यान अनेकांना खरंतर धक्का बसला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी नितीन देसाई यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटो सोबत अनेक साऱ्या आठवणी. सोनाली कुलकर्णी यांनी त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांना उजाळा देत म्हंटल आहे कि,

नितीन..

किती काम केलं आपण एकत्र..

तुझ्या पहिल्या मोठ्या कारमध्ये तू आम्हाला चक्कर मारून आणली होतीस.. तुझ्या स्टुडिओतला तुझा पहिला इंटरव्हयू मी घेतला होता..

आपल्याला नॅशनल अवॅार्ड एकत्र मिळालं होतं..

किती आठवणी…..!!!

आत्ता आत्तापर्यंतच्या..

पण तुझ्या आत काय कोलाहल चालू होता कळलंच नाही कधी..

वाटलं फक्त तुझ्या कल्पक, भव्य आयडिया आणि स्वप्नं असतात तिथे..

ND Studios हा सर्वार्थानं लॅण्डमार्क आहे सगळ्यांसाठी..

हे काय करून बसलास मित्रा..

हे काय करून बसलास..

खिन्न, उद्विग्न आणि सुन्न..

💔🖤

Prayers.. 🙏

and strength to the family..

Updated : 3 Aug 2023 3:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top