Home > News > इंजिनीअर नवऱ्याने बायकोला दिलं असं काही गिफ्ट, बघण्यासाठी लोकांची होतेय गर्दी

इंजिनीअर नवऱ्याने बायकोला दिलं असं काही गिफ्ट, बघण्यासाठी लोकांची होतेय गर्दी

इंजिनीअर नवऱ्याने बायकोला दिलं असं काही गिफ्ट, बघण्यासाठी लोकांची होतेय गर्दी
X

मुंबई: बिहारच्या पटना येथील मेकॅनिकल इंजिनीअर अनुज कुमार यांच्या घरी सद्या परिसरातील लोकांची मोठी गर्दी होत आहे. आणि ह्या गर्दीच कारण ठरलय अनुज कुमार यांनी आपल्या पत्नीला दिलेली अनोखी भेट, आता तुम्ही म्हणालं ह्या बाबाने असं काय केलं, तर त्यासाठी ही बातमी पहाच.

काही दिवसांपूर्वी अनुज यांच्या घरात मोठ्याप्रमाणावर पाहुणे आले होते. या पाहुण्यांना जेवण आणि इतर गोष्टी देण्यासाठी अनुज यांच्या पत्नीला अनेकदा पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर पायऱ्या चढून जावं लागत. यावेळी एकदा त्या पडल्या सुद्धा. त्यामुळे यावर काही तरी पर्याय करायचं अनुज ठरवलं.
त्यांनतर इंजिनीअर असलेल्या अनुजने घरात एक लिफ्ट बसवली आहे, ज्यामध्ये चहा-स्नॅक्स आणि अन्न घराच्या एका मजल्यापासून दुसर्‍या मजल्यावर नेले जाते. तसेच घरातील लोक आणि पाहुणे कोणत्याही मजल्यावर असले तरीही त्यांच्या खोलीत लिफ्टद्वारे अन्न सहजतेने पोहचवता येते. त्यामुळे पत्नींसाठी अनुजने बनवलेली लिफ्ट गिफ्ट ठरलीय.

अनुजने बनवलेल्या ह्या लिफ्टची परिसरात चर्चा असून, आजूबाजूची लोकं लिफ्ट पाहण्यासाठी अनुज यांच्या घरात गर्दी करत आहे. तर अनेकांनी आम्हालाही अशीच लिफ्ट बनवून द्या, अशी मागणीही अनुजकडे केली आहे.
Updated : 3 July 2021 4:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top