Home > News > वादग्रस्त व्याख्यात्या अपर्णा रामतीर्थकर यांचं निधन

वादग्रस्त व्याख्यात्या अपर्णा रामतीर्थकर यांचं निधन

वादग्रस्त व्याख्यात्या अपर्णा रामतीर्थकर यांचं निधन
X

( Aparna Ramtirthkar )अपर्णा रामतीर्थकर यांचं आज (28 एप्रिल) सोलापूर इथं निधन झालं. त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना सोलापुर येथे अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांनी सोलापुर इथं पाखर संकुल या अनाथ मुलांच्या वसतीगृहाच्या उभारणी करण्यात मोलाचा सहभाग नोंदवला होता.

अपर्णा रामतीर्थकर त्यांच्या विवादास्पद वक्तव्याने चर्चेत राहायच्या. त्यांना पक्षाघाताचा झटका आल्याने गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मृत्यूसमयी त्या 65 वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत.

Updated : 28 April 2020 8:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top