Latest News
Home > News > ICC Awards: सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू म्हणून स्मृती मानधना यांची निवड..

ICC Awards: सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू म्हणून स्मृती मानधना यांची निवड..

ICC Awards: सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू म्हणून स्मृती मानधना यांची निवड..
X

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधाना यांना ICC महिला एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून घोषित करण्यात आले आहे. मंधानाने 22 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 38.86 च्या सरासरीने एक शतक आणि पाच अर्धशतकांसह 855 धावा केल्या आहेत.

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधना हिची ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे. स्मृतीची कारकिर्दीत दुसऱ्यांदा ICC महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली आहे. यापूर्वी 2018 मध्येही त्यांना हा सन्मान मिळाला होता. पुरुष क्रिकेट टीम मध्ये यावर्षी कोणत्याही भारतीय खेळाडूला कोणत्याही प्रकारात पुरस्कार जिंकता आला नाही.

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सलामीवीर स्मृती मानधना यांनी गेल्या वर्षी 22 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 38.86 च्या सरासरीने 855 धावा केल्या होत्या. गेल्या वर्षीही त्यांनी 1 शतक आणि 5 अर्धशतके झळकावली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत देखील भारताने स्मृती मानधनाने चांगली कामगिरी केली होती.

Updated : 26 Jan 2022 4:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top