Home > News > #viral इंधन दरवाढीवरच्या प्रश्नावर स्मृती इराणी गांगरल्या, व्हिडीओ झाला व्हायरल...

#viral इंधन दरवाढीवरच्या प्रश्नावर स्मृती इराणी गांगरल्या, व्हिडीओ झाला व्हायरल...

महागाईवर विचारलेल्या प्रश्नाला स्मृती इराणींनी कोरोना लसींचे डोस मोजून दाखवले

#viral इंधन दरवाढीवरच्या प्रश्नावर स्मृती इराणी गांगरल्या, व्हिडीओ झाला व्हायरल...
X

पाच राज्यांच्या निवडणूकीनंतर देशामध्ये अचानक महागाईची लाट आलीये. रोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे दर वाढत आहेत. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला अतिरीक्त भुर्दंड लागतोय जो परवडणारा नाहीये. सामान्य जनता या महागाईमुळे पार पिचून गेली आहे.

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यांनंतर दुध आणि कमर्शियल सिलेंडरचे दर वाढले होते. यानंतर जसे पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागले त्यानंतर तर दिवसागणिक इंधनांचे भाव वाढतच गेले. सध्याच्या घडीला फक्त मुंबईत १२० रूपये लीटर ने विकलं जातंय. तर डिझेलने देखील शंभरी कधीच ओलांडली आहे. घरगुती सिलेंडरच्या किंमती या ९५० पार गेल्या आहेत. हे कमी होतं की काय म्हणून आता लिंबाचे दर ३०० रूपये प्रति किलो झाले आहेत. या महागाईमुळे सर्व स्तरातून केंद्रसरकारवर फक्त आणि फक्त टिकाच केली जातेय.

असाच एक प्रश्नार्थक व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. काँग्रेसच्या नेट्टा डिसुझा या आणि देशाच्या महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी या एकाच विमानातून प्रवास करत होत्या. अशावेळी जर दोघीमध्ये काही चर्चा झाली नसती तर नवल वाटलं असतं. चर्चा झाली. तीही थेट मोबाईल रेकॉर्डिंग सुरू ठेऊन ! केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना नेट्टा डिसुझा यांनी पेट्रोल डिझेल दरवाढीवर प्रश्न विचारला तर स्मृती इराणींनी त्यांना थेट मॅम आपण खोटं का बोलत आहात अशा प्रतिक्रीया दिली. यानंतर पुन्हा या दोघींमधली चर्चा सुरू झाली. नेट्टा यांनी पुन्हा इंधन दरवाढ का झाली या बद्दलचा प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी देशभरात झालेल्या मोफत लसीकरणाचे आकडे मोजून दाखवले. इतकंच नाही तर उत्तरप्रदेशमध्ये मोफत वाटप झालेल्या अन्नधान्याचा दाखला देत ३० कोटी लोकांना मोफत राशन दिल्याचे सांगितले. यानंतर नेट्टा यांनी पुन्हा एकदा पुन्हा एकदा हाच प्रश्न विचारला तेव्हा स्मृती इराणींनी आपण माझ्या परवानगीशिवाय व्हिडीओ रेकॉर्ड करत आहात असा आव आणला पण महागाईवर काही उत्तर दिलं नाही.

स्मृती इराणीच का होत आहेत ट्रोल?

२००९ ते २०१४ या कार्यकाळात देशात कॉंग्रेस नेतृत्व करत असलेल्या युपीए आघाडीचं सरकार होतं. भाजप त्यावेळी विरोधात होतं. त्यावेळी सिलेंडरचे दर ३५० रूपयांच्या आसपास असताना स्मृती इराणी यांना महागाईमुळे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांना बांगड्या पाठवल्या होत्या. अनेक आंदोलनांचं त्यांनी नेतृत्व केलं होतं. त्यामुळे सध्या महागाईवर सरकारला ट्रोल करतेवेळी स्मृती इराणी यांच्या जुन्या व्हिडीओ देखील व्हायरल केल्या जातात. त्यामुळेच साहजिकच महागाई वाढली की स्मृती इराणी यांना ट्रोल केलं जातं. पण या व्हिडीओमध्ये ज्या पध्दतीने स्मृती इराणींनी महागाईवर उत्तर देणं टाळलंय यानंतर त्या आणखी ट्रोल होणार हे निश्चित!

Updated : 10 April 2022 2:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top