Home > News > Shahabuddin daughter marriage: शहाबुद्दीन यांच्या मुलीचं शाही थाटात लग्न, हत्ती घोड्यांवरून येणार वऱ्हाडी!

Shahabuddin daughter marriage: शहाबुद्दीन यांच्या मुलीचं शाही थाटात लग्न, हत्ती घोड्यांवरून येणार वऱ्हाडी!

Shahabuddin daughter marriage: शहाबुद्दीन यांच्या मुलीचं शाही थाटात लग्न, हत्ती घोड्यांवरून येणार वऱ्हाडी!
X

बिहारचे मोठे नेते मोहम्मद शहाबूद्दीन यांच्या मुलीचं हेरा शहाबचं लग्न अगदी राजेशाही थाटात आज सोमवारी लागणार आहे. शहाबच्या लग्नासोबतच शहाबूद्दीन यांचा मुलगा ओसामा शहाब याच्या लग्नाचं रिसेप्शन देखील होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांची तयारी पूर्ण झाली आहे. वऱ्हाडाच्या स्वागतासाठी बाहूबलीच्या सेट प्रमाणे भल्या मोठ्या मंडपाची उभारणी करण्यात आली आहे.

मोहम्मद खालीद यांनी सांगितलं की साहेबांच्या मुलीच्या लग्नात आर.पी.सिंह, अल्पसंख्यांक मंत्री जमा खान यांच्यासमवेत अनेक मंत्री येण्याची शक्यता आहे. मुख्यंमंत्री नितीश कुमार यांना देखील आमंत्रण देण्यात आलं होतं परंतू त्यांच्याकडून कोणतंही कन्फर्मेशन आलेलं नाही.


तेजस्वी आणि तेजप्रताप सुध्दा लावणार हजेरी

याशिवाय मोहम्मद खालीद यांनी सांगितलं की विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव यांच्यासमवेत राजदचे अनेक आमदार सहभागी होणार आहेत. सर्व पाहूण्यांच्या आदरातिथ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे.


५०० चूलींवर तयार होणार शाकाहारी आणि मांसाहारी जेवण

या शाही विवाहसोहळ्यात पाहूण्यांसाठी तब्बल ५०० चुलींवर जेवण शिजणार आहे. यात शाकाहारी तसेच मांसाहारी जेवणाचा देखील समावेश आहे. जेवण बनवण्यासाठी उत्तरप्रदेश, बंगाल तसेच संपूर्ण राज्यभरातून उत्तम खानसामे (आचारी) यांना बोलावण्यात आलं आहे.


जागोजागी होणार वऱ्हाडाचं स्वागत

वरात लग्नमंडपापर्यंत पोहचेपर्यंत अनेक ठिकाणी तिच्यावर पूष्पवृष्टी होणार आहे. अनेक आमदार आपापल्या परीसरात वरातीचं स्वागत करणार आहेत.

Updated : 15 Nov 2021 12:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top