Home > News > पार्श्वगायिका वैशाली भैसने माडेला मिळाली जिवे मारण्याची धमकी

पार्श्वगायिका वैशाली भैसने माडेला मिळाली जिवे मारण्याची धमकी

पार्श्वगायिका वैशाली भैसने माडेला मिळाली जिवे मारण्याची धमकी
X

मराठी आणि बॉलिवूड(Bollywood) मधील पार्श्वगायिका वैशाली भैसने माडे हि तिच्या सुंदर आवाजामुळे आणि तिच्या गाण्यामुळे सतत चर्चेत असते. ती मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाली होती. बिग बॉसमधील तिच्या खेळामुळे तिच्या चाहतावर्गात वाढच झाली होती. पण तिच्या जीवाला धोका असल्याचे तिने फेसबूक पोस्टद्वारे सांगितलं आहे.

वैशालीने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे.काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जातोय. दोन दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट मी करणार आहे.आज मला तुमच्या सपोर्टची गरज आहे.

याप्रकरणाबाबत वैशाली आता लवकरचं पत्रकार परिषद घेऊन या गोष्टीबाबत खुलासा करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

वैशाली ही हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांतील चित्रपटांमध्ये पार्श्वगायन करते.बाजीराव मस्तानी या चित्रपटातील पिंगा हे गाणं तिने गायलं आहे.या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलय़ं. तसेच तिने मराठी चित्रपटातील अनेक गाणी गायली आहेत.वैशाली ही सारेगमप या स्पर्धेची विजेती ठरली होती.तिला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलयं

काही महिन्यांपूर्वी वैशालीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैशालीचे स्वागत केले होते. यावेळी पक्षातील काही ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. वैशालीच्या प्रवेशाचा कार्यक्रम पक्षाच्या मुंबई येथील मुख्यालयात झाला होता. वैशालीला विदर्भाचं विभागीय अध्यक्षपद देण्यात आलं आहे.

Updated : 18 Feb 2022 8:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top