Home > News > #ShwetaTiwari : "देव माझ्या ब्राची साईज घेत आहे.'' अभिनेत्रीच्या वक्तव्यावरून वाद..

#ShwetaTiwari : "देव माझ्या ब्राची साईज घेत आहे.'' अभिनेत्रीच्या वक्तव्यावरून वाद..

#ShwetaTiwari  : देव माझ्या ब्राची साईज घेत आहे. अभिनेत्रीच्या वक्तव्यावरून वाद..
X

बिग बॉस सीझन 4 ची विजेती आणि अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्या विधानावरुन देशभरात खळबळ उडाली आहे. श्वेताने भोपाळमध्ये माध्यमांसमोर म्हणाली होते की, देव तिच्या ब्राचा साइज घेत आहे. तिच्या वक्तव्यावरून आता मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी भोपाळ पोलिस आयुक्तांना २४ तासांत चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. फॅशनशी संबंधित वेब सीरिजच्या तयारी आणि प्रमोशनसाठी श्वेता २६ जानेवारीला प्रोडक्शन टीमसोबत भोपाळला आली होती. हॉटेलमध्ये मीडियासमोर तिने हे वक्तव्य केलं,

अभिनेत्रीने असं वक्तव्य का केलं?

भोपाळ शहरातील एका हॉटेलमध्ये श्वेताच्या टीमची मुलाखत सुरू होती. त्यादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. श्वेता तिवारी मीडियासमोर बोलत होती, तो या प्रोजेक्टमध्ये तिचा सहकलाकार सौरभ राज जैन आहे. स्टेजवर श्वेतासोबत अभिनेता कंवलजीत, सौरभ राज जैन, रोहित रॉय आणि दिगांगना सूर्यवंशी उपस्थित होते. हे सर्वजण भोपाळमध्ये शूट होणार्‍या 'शोस्टॉपर' या वेब सीरिजच्या प्रमोशन आणि घोषणेसाठी आले होते. सर्व मालिकांमध्ये एकत्र काम करणार आहे.

मालिकेतील एक पात्र ब्रा फिटरचे आहे. जो सौरभ करत आहे. या अभिनेत्याने यापूर्वी महाभारत मालिकेत भगवान कृष्णाची भूमिका साकारली होती. याविषयी स्टेजचे सूत्रसंचालन करणाऱ्या साहिलने विचारले की, आतापर्यंत तू देवाची भूमिका करत होतास आणि आता थेट ब्रा फिटरची भूमिका करत आहेस. दरम्यान, श्वेता हसत हसत म्हणाली – "देव माझ्या ब्राची साईज घेत आहे.'' आणि त्यानंतर हा वाद सुरू झाला.

Updated : 27 Jan 2022 10:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top