Home > News > सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार! सुप्रिया सुळेंनी गृहखात्यावर साधले निशाणे

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार! सुप्रिया सुळेंनी गृहखात्यावर साधले निशाणे

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार! सुप्रिया सुळेंनी गृहखात्यावर साधले निशाणे
X

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या वांद्रे (Bandra) येथील निवासस्थानाबाहेर आज पहाटे गोळीबार झाला. या घटनेने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळेंचा आरोप:

सुप्रिया सुळे यांनी गृहखात्यावर हल्लाबोल करताना म्हटले आहे की, "हे गृहखात्याचे अपयश आहे." त्या पुढे म्हणाल्या, "सलमान खान ज्या भागात राहतो तो भाग अतिशय सुरक्षित आहे. सकाळी लोक तिथे मॉर्निंग वॉकसाठी जातात, भाजीवाले आणि दुधवालेही तिथे येतात. त्यांच्या सुरक्षेचा काय विचार? हे निश्चितच गृहखात्याचे अपयश आहे. सलमानच्या कुटुंबावर मोठा मानसिक ताण आला आहे." असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर सुप्रिया सुळेंची चिंता:

सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरही चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, "आता आपण पुण्यात आहोत आणि इथे काय चालले आहे ते आपण पाहतो. हे खूपच सुशिक्षित शहर आहे जिथे लोक शांततेने राहतात, पण इथेही गुन्हेगारी वाढली आहे. मी कोणावरही आरोप करत नाही, परंतु हे आकडेवारी आहेत जे भारत सरकारने महाराष्ट्रासाठी दिले आहेत."

आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी सलमान खानच्या घरावर गोळीबार केला. या गोळीबारात कोणालाही दुखापत झाली नाही. सलमान खान सध्या घरात सुरक्षित आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि क्राइम ब्रँचची टीम तपास करत आहे. हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि लोकांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.

Updated : 14 April 2024 7:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top