Home > News > नेमबाज मोनाली गोऱ्हे यांचं कोरोनामुळे निधन;काही तासांपूर्वी वडिलांनी सोडले प्राण

नेमबाज मोनाली गोऱ्हे यांचं कोरोनामुळे निधन;काही तासांपूर्वी वडिलांनी सोडले प्राण

काही दिवसांपूर्वी मोनाली गोऱ्हे यांना कोरोनाची लागण झाली होती.

नेमबाज मोनाली गोऱ्हे यांचं कोरोनामुळे निधन;काही तासांपूर्वी वडिलांनी सोडले प्राण
X

मुंबई: भारताच्या युवा नेमबाज संघाच्या माजी सहाय्यक प्रशिक्षक आणि श्रीलंकेचा नेमबाज संघाच्या प्रशिक्षक, शूटर मोनाली गोऱ्हे यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, सकाळीच त्यांच्या वडिलांचेही कोरोनामुळे निधन झालं.

काही दिवसांपूर्वी मोनाली गोऱ्हे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांचा घरातील सदस्यांनी सुद्धा कोरोनाची चाचणी करून घेतली होती. त्यानंतर त्यांच्या वडिलांचा रिपोर्ट सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर नाशिकमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचं निधन झालं.

वडिलांच्या निधनाची बातमी आल्यानंतर, काही तासांनी मोनाली यांनी उपचारादरम्यान दुपारी प्राण सोडल्याची बातमी समोर आली. पित्यापाठोपाठ मोनाली यांचाही मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Updated : 20 May 2021 12:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top