Home > News > SHOCKING! दारूच्या नशेत विनोद कांबळीकडून पत्नीला मारहाण..

SHOCKING! दारूच्या नशेत विनोद कांबळीकडून पत्नीला मारहाण..

SHOCKING! दारूच्या नशेत विनोद कांबळीकडून पत्नीला मारहाण..
X

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. त्याची पत्नी अँड्रिया हिने प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला आहे. मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. दारूच्या नशेत असलेला पती विनोद कांबळी याने तिच्याशी गैरवर्तन करून मारहाण केल्याचे अँड्रियाने तक्रारीत म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

वांद्रे पोलिसांनी याबाबत सांगताना म्हंटले आहे की, कांबळीविरुद्ध मारहाण आणि गैरवर्तनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आलेली नाही. त्याचा फोन बंद होत आहे. त्याच्या पत्नी अँड्रियाने दिलेल्या तक्रारीत त्याच्यावर स्वयंपाक करण्यासाठी वापरणाऱ्या भांड्याने प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला आहे. यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

पोलिसांनी कांबळीला नोटीस बजावली..

वांद्रे पोलीस रविवारी कांबळीच्या घरी पोहोचले. त्यांनी कांबळी यांना कलम ४१अ अंतर्गत नोटीस दिली आहे. त्यांना पोलीस ठाण्यात जाऊन जबाब नोंदवावा लागणार आहे.

दारू पिऊन भांडण..

ही घटना शुक्रवारी दुपारी 1 ते 1.30 च्या दरम्यान असल्याची माहिती आहे. कांबळी दारूच्या नशेत घरी आला आणि काही कारणावरून त्याचे पत्नीशी भांडण झाले. त्यांच्या 12 वर्षांच्या मुलाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी मुलगा व पत्नी दोघांनाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्यांनी किचनमधून भांडी आणून अँड्रियावर फेकली. भांडे त्यांच्या डोक्याला लागले. त्यानंतर त्याने मुलगा आणि पत्नीवरही बॅटने हल्ला केला. मात्र, पत्नीने ते थांबवले. त्यानंतर त्यांच्या पत्नीवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू झाले..

Updated : 6 Feb 2023 7:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top