Home > News > शिवसेना नेत्याने काढली अमृता फडणवीस यांची बुध्दी.....

शिवसेना नेत्याने काढली अमृता फडणवीस यांची बुध्दी.....

शिवसेना नेत्याने काढली अमृता फडणवीस यांची बुध्दी.....
X

अमृता फडणवीस या सातत्याने ट्विटरवर ऍक्टीव्ह असतात. त्यांच्या ट्विट्समुळे त्या सातत्याने चर्चेत असतात. त्यांनी पुन्हा एकदा आता नवं ट्विट करत चाहत्यांना रिकाम्या जागा भरण्यास सांगितलं आहे. योग्य उत्तर देणाऱ्याचं ट्विट त्या लाईक करणार आहे असं त्या म्हणाल्या आहेत.

अमृता फडणवीस यांना सध्या कोणत्याही ओळखीची गरज नाही. नुकतंच त्यांनी ट्विटरवर एक ट्विट केलं आहे. ज्यात त्यांनी त्यांच्या चाहत्यांना रिकाम्या जागा भरायला सांगितल्या आहेत. "रिकाम्या जागा भरा; आज मी___ १) कोरोना पॉझिटीव्ह झाले आहे २) एक दुखःद प्रेम गीत लिहितेय ३) पावसाळ्यापुर्वी मुंबईतील रस्त्यांची पाहणी करण्याचा प्लॅन तयार करतेय..... योग्य उत्तर देणाऱ्यास मिळेल लाईक" असं आपल्या ट्विट मध्ये अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

त्यांच्या या ट्विटला ६६ रिट्विट्स आल्या आहेत तर ४९ जणांनी त्यांचं ट्विट को केलं आहे. त्यांच्या ट्विटला १३२९ जणांनी लाईक देखील केलं आहे. शिवाय अनेकांनी त्यांना प्रतिक्रीयादेखील दिल्या आहेत. काहींनी त्यांच्या प्रश्नांचं उत्तर दिलं आहे तर काहींनी त्यांच्यावर टीका देखील केली आहे.

शिवसेनेच्या महिला नेत्या अयोध्या पोळ यांनी त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर प्रतिक्रीयेद्वारे दिलं आहे. अयोध्या यांनी दुसरा पर्याय निवडत अमृता फडणवीस यांची विवेकबुध्दीच काढली आहे. "एक दुखःद प्रेम गीत लिहितेय तेही कोणत्याही विवेक बुध्दीशिवाय...."

अर्थात अयोध्या पोळ यांच्या या उत्तरावर अमृता फडणवीसांच्या अनेक चाहत्यांनी टीका देखील केली आहे.

तर आशिष मेटे यांनी अमृता यांना एक सल्लाच देऊ केला आहे. "आज सोमवार आहे खरंतर तुम्ही बॅंकेत असायला पाहिजे…Working Day"

शिवाय संदिप अहुजा यांनी देखील त्यांना उत्तर दिलं आहे. ते म्हणतात, " कालच श्रीमान देवेंद्र फडणवीस हे कोरोना पॉझिटीव्ह निघाले आहेत त्यामुळे आपल्याला सुध्दा कोरोनाची लागण झाली आहे."

तर अजित यांनी, "तुम्ही काहीही करा; पण देवाने मात्र आज एक जरूर करावे, ते म्हणजे आपल्याला उदंड मॅच्युरिटी द्यावी, जेणेकरून आपल्या ट्विट्समुळे आपल्या लोकप्रिय पतीला मान खाली घालण्याची वेळ येऊ नये." म्हणत त्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रीया येतील न येतील त्यांना उत्तरं मिळतील न मिळतील. तरीही त्यांना जे वाटतंय ते करण्याचा त्यांना हक्क आहे. आणि उरला प्रश्न राजकारणाचा तर त्या ते सक्रीय नसुनही करत आहेतच.

Updated : 6 Jun 2022 2:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top