Home > News > 'एक किलो आलू, चार दयालू'; भाजप नेत्यांवर उर्मिला मातोंडकरांची टीका

'एक किलो आलू, चार दयालू'; भाजप नेत्यांवर उर्मिला मातोंडकरांची टीका

'एक किलो आलू, चार दयालू'; भाजप नेत्यांवर उर्मिला मातोंडकरांची टीका

एक किलो आलू, चार दयालू; भाजप नेत्यांवर  उर्मिला मातोंडकरांची टीका
X

मुंबई: केंद्रात असलेल्या मोदी सरकारला रविवारी 7 वर्षे पूर्ण झालीत. यानिमित्ताने देशभरात भाजपकडून विविध कार्यक्रम करण्यात आले तर, काही ठिकाणी गोर-गरिबांना मदतही करण्यात आली. अशाच एका मदतीच्या फोटोवरून भाजप नेत्यांवर टीका होत असून, सोशल मीडियावर ट्रोल सुद्धा केलं जातं आहे.

केंद्रात मोदी सरकारला 7 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी भोपाळमध्ये अनेक ठिकाणी गोर-गरिबांना रेशन किटच वाटप केले. मात्र ट्विटरवर त्यांनी मदतीचा टाकलेल्या एका फोटोवरून त्यांच्यावर टीका होत आहे.

एक महिलेला रेशन किट देताना फोटोमध्ये तब्बल 5-6 नेते दिसत आहे. त्यामुळे मदतीपेक्षा फोटोसेशन जास्तच झाल्याची टीका त्यांच्यावर होत असून, त्यांना अनेक जण ट्रोलही करत आहे.

यावरून शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीही भाजपवर टीका केली आहे. मातोंडकर यांनी ट्विट करत, "1 किलो आलु 4 दयालू ", खोचक टोला लगावला आहे.

Updated : 31 May 2021 7:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top