Home > News > Sheena Bora Murder Case; इंद्राणीचा जामीन अर्ज सहाव्यांदा फेटाळला

Sheena Bora Murder Case; इंद्राणीचा जामीन अर्ज सहाव्यांदा फेटाळला

Sheena Bora Murder Case; इंद्राणीचा जामीन अर्ज सहाव्यांदा फेटाळला
X

शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी मुंबईच्या भायखळा महिला कारागृहात बंद असलेल्या इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा फेटाळला. इंद्राणीचा जामीन अर्ज फेटाळण्याची ही सहावी वेळ आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्येही मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने इंद्राणीचा जामीन अर्ज फेटाळला होता. न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यासमोर इंद्राणीच्या याचिकेवर सुनावणी झाली. जामीन अर्ज गुणवत्तेच्या आधारावर दाखल करण्यात आल्याने न्यायमूर्ती सांबरे यांनी इंद्राणीच्या वकिलांना तो फेटाळण्यापूर्वी मागे घेण्यास सांगितले. या अर्जाला सीबीआयने कडाडून विरोध केला असून, तिच्यावर शीना बोराचे अपहरण आणि हत्या केल्याचा आरोप आहे, त्यामुळे ती बाहेर पडल्यास खटल्यावर परिणाम होऊ शकतो. अस CBI ने म्हंटले आहे.

इंद्राणीने कोर्टात काय याचिका केली होती

50 वर्षीय इंद्राणी मुखर्जी गेल्या सहा वर्षांपासून तुरुंगात आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. इंद्राणीने तिच्या याचिकेत म्हटले आहे की, सीबीआयने या प्रकरणात सूचीबद्ध केलेल्या 253 साक्षीदारांपैकी आतापर्यंत केवळ 68 साक्षीदार तपासले गेले आहेत. त्यामुळे हे प्रकरण लवकर समोणार नाही. यासोबत इंद्राणीने वाढलेले वय आणि तुरुंगातील तिची तब्येत बद्दल देखील कोर्टात सांगितले होते.

सीबीआयला आता या प्रकरणाचा तपास थांबवायचा आहे

सीबीआयने शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतेच सीबीआयने मुंबईच्या विशेष न्यायालयात 2012 मध्ये झालेल्या या हत्येचा तपास पूर्ण झाल्याचे सांगितले होते. सीबीआयने या प्रकरणी तीन आरोपपत्रे आणि दोन पुरवणी आरोपपत्रे दाखल केली आहेत, ज्यात इंद्राणी मुखर्जी, तिचा ड्रायव्हर श्यामवर राय, संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जी यांची आरोपी म्हणून नावे आहेत. 25 वर्षीय शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी इंद्राणीला 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. शीना ही इंद्राणीच्या पहिल्या लग्नापासूनची मुलगी होती.

Updated : 17 Nov 2021 6:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top