Home > News > शरद पवार भाजपसोबत गेले तर त्यांच नुकसान होईल - यशोमती ठाकूर

शरद पवार भाजपसोबत गेले तर त्यांच नुकसान होईल - यशोमती ठाकूर

शरद पवार भाजपसोबत गेले तर  त्यांच नुकसान होईल  - यशोमती ठाकूर
X

महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी इंडिया (I.N.D.I.A.) ची बैठक होणार आहे.अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर शरद पवार यांची नेमकी भूमिका काय? असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातो. यामुळे महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमिवर महाविकास आघाडीच भविष्यात टीकणार भारतात इंडियाच येणार असल्याचं वक्तव्य माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांनी केलंय

दरम्यान यशोमती ठाकूर माध्यामांशी बोलताना म्हणाल्या की "येणाऱ्या काळात महाविकास निवडून येईल आणि भारतात इंडियाच येणार असल्याचं विश्वास त्यांनी व्यक्त केलां यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी गटावावर बोलत असताना म्हणाल्या की "सार्वजनिक रित्या महाराष्ट्रातील घडामोडी बघितल्या तर मूळ शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे. आणि मूळ राष्ट्रवादी ही शरद पवार यांची आहे. जे लोकं बाहेर गेलेत ते संविधानिक दृष्ट्या अपात्र आहे. इलेक्शन कमिशन काय निर्णय घेईल? हे आधीपासून माहित आहे. सरकारच्या ह्या एजन्सी म्हणून त्या राबवता, 'भाजपमध्ये दम राहिला नाही" असं म्हणतं यशोमती ठाकूर यांनी असा टोलाच लगावला आहे.

यावेळी ठाकूर म्हणाल्या की "शरद पवार या वयामध्ये या परिस्थितीमध्ये आहेत. मला वाटत नाही त्यांच्या मूळ विचार धारेपासून दूर जाऊन ते बीजेपी सोबत बसतील. पण ते जर गेले तर त्यांच नुकसान होईल". असं वक्तव्य ठाकूर यांनी केलं आहे

.

Updated : 26 Aug 2023 7:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top