Home > News > 'कमला हॅरीस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती होऊ शकतात तर सोनिया गांधी पंतप्रधान का होऊ शकत नाहीत?' - रामदास आठवले

'कमला हॅरीस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती होऊ शकतात तर सोनिया गांधी पंतप्रधान का होऊ शकत नाहीत?' - रामदास आठवले

काँग्रेसला बळकटी देण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पंतप्रधान बनवायला हवे होते.

कमला हॅरीस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती होऊ शकतात तर सोनिया गांधी पंतप्रधान का होऊ शकत नाहीत? - रामदास आठवले
X

संयुक्त पुरोगामी आघाडीला (NDA) 2004 च्या निवडणुकीत बहुमत मिळाले होते. या वेळी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान व्हावे असा प्रस्ताव मी दिला होता. मला त्या परदेशी असण्याच्या मुद्द्याचा काहीच अर्थ नव्हता.

सोनिया गांधी यांना स्वतः हे पद स्वीकारायचे नव्हते तर त्यांनी काँग्रेसला बळकटी देण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पंतप्रधान बनवायला हवे होते असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी इंदोर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे.

कमला हॅरीस या भारतीय वंशाच्या महिला अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनू शकतात तर सोनिया गांधी भारताच्या नागरिक असून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी व लोकसभेत खासदार म्हणून निवडून आलेल्या असताना देखील पंतप्रधान का होऊ शकत नाही? असा एक प्रश्न मंत्री आठवले यांनी उपस्थित केला.

Updated : 26 Sep 2021 3:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top