Home > News > नाशिकमधील शिक्षकाची लज्जास्पद कृती,मासिक पाळी आलेल्या मुलीला केली वृक्षारोपणास मनाई

नाशिकमधील शिक्षकाची लज्जास्पद कृती,मासिक पाळी आलेल्या मुलीला केली वृक्षारोपणास मनाई

नाशिक मधील त्र्यंबकेश्वर येथे शासकीय कन्या आश्रम शाळा आहे शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम दरम्यान शिक्षक आर.टी.देवरे यांनी ज्या मुलींना मासिक पाळी आली आहे त्यांनी झाडे लावू नये अशी सूचना दिली.मागील वर्षी झाडे जगली नाहीत याचं कारण मुलींची मासिक पाळी कारणीभूत असल्याचे सांगत यावर्षी झाडे लावण्यास मज्जाव केला आहे.

नाशिकमधील शिक्षकाची लज्जास्पद कृती,मासिक पाळी आलेल्या मुलीला केली वृक्षारोपणास मनाई
X

आजही काही ग्रामीण भागात मासिक पाळी झालेल्या महिलेस किंवा मुलीस स्वतंत्र खोलीत राहायला लावतात त्याचप्रमाणे अनेक अंधश्रद्धा सुद्धा पाळल्या जातात जसं दरवाजाला लिंबू मिरची बांधणे, रात्री नखे न कापणे,घरातील कचरा रात्री बाहेर न टाकणे आशा अनेक अंधश्रद्धा पाळल्या जातात.या आश्रम शाळेतील अकरावीतील मुलीला मासिक पाळी झाल्याने शिक्षक आणि वृक्षारोपण करण्यास मनाई केली यावर आता समाज माध्यमांमधून तीव्र प्रतिसाद उमटत आहे.


यावर माजी महिला व बालकल्याण मंत्री, काँग्रेसच्या नेत्या, यशोमती ठाकूर यांनी संतप्त होत या घटनेचा निषेध व्यक्त केला, नाशिक मधील प्रकार अतिशय धक्कादायक असल्याचे त्यांनी सांगितले, अंधश्रद्धा मिटवण्यासाठी आपण झटत आहे. मात्र एक शिक्षक असं करत असेल ते आश्चर्य आहे,आता आपण या सर्व गोष्टीच्या पलीकडे गेलो पाहिजे या घटनेला अंधश्रद्धाच रूप देत आहे हे कोणी कबूल करणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली

तर भाजपाच्या चित्रा वाघ यांनी सुद्धा एक ट्विट केला आहे नाशिक जिल्हा आश्रम शाळेत विद्यार्थिनींना पाळी असल्याने शिक्षकाने वृक्षारोपण करू न देण्याची संतापजनक घटना घडल्याचे समजल्यानंतर, शिक्षकांकडून अशी वर्तवणूक होत असेल तर त्याचा निषेधच केला पाहिजे. राज्य सरकारने याची तात्काळ माहिती घेऊन संबंधित शिक्षकावर कारवाई करावी ,असे ट्विट त्यांनी केले आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सुद्धा या प्रकरणाच्या संबंधित विभागाला पुरोगामी महाराष्ट्रात एका शिक्षकाकडून अंधश्रद्धेच खतपाणी घालून मुलींच्या नैसर्गिक धर्माबाबत न्यूनगंड निर्माण करण्याचा प्रयत्न केलेल्या शिक्षकावर कारवाई करण्यासंबंधी पत्र पाठवले आहे.




Updated : 26 July 2022 8:42 PM IST
Next Story
Share it
Top