Latest News
Home > News > रक्षाबंधनाच्या मुहूर्ताआधीच "सामूहिक बलात्कार" घटनेने महाराष्ट्राची मान शरमेने झुकली - शालिनी ठाकरे

रक्षाबंधनाच्या मुहूर्ताआधीच "सामूहिक बलात्कार" घटनेने महाराष्ट्राची मान शरमेने झुकली - शालिनी ठाकरे

रक्षाबंधनाच्या मुहूर्ताआधीच  सामूहिक बलात्कार घटनेने महाराष्ट्राची मान शरमेने झुकली - शालिनी ठाकरे
X


घरात झालेल्या वादानंतर बाहेर पडलेल्या महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. भंडारा जिल्ह्यात असणाऱ्या कन्हाळमोह जंगलात तीन ते चार जणांनी पीडितेवर बलात्कार केला. त्यानंतर निर्वस्त्र आणि बेशुद्ध अवस्थेत तिला तिथेच सोडून आरोपी पळून गेले. सध्या पीडित महिलेवर नागपूरच्या वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समजते. सामूहिक बलात्कारामुळे पाच शस्त्रक्रिया करव्या लागणार आहे . तिच्या शरीर व मनाची अवस्था बिकट झाली आहे. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी जितेंद्र ठाकरे यांनी सोशल मिडीयावर प्रतिक्रीया दिली आहे.

बहिणीसोबत झालेल्या भाडंणामुळे ३० जुलैला रागाच्या भरात ती घरातून निघाली होती. भंडारा जिल्ह्यात असणाऱ्या आईकडे ती चालत निघाली होती. याचा काही नराधमांनी गैरफायदा घेतला. दरम्यान यावर शालिनी ठाकरे म्हणाल्या की.. रक्षाबंधनाचा सण एक आठवड्यावर असताना भंडारा जिल्ह्यात घडलेल्या "सामूहिक बलात्काराच्या" घटनेमुळे महाराष्ट्राची मान पुन्हा एकदा शरमेने झुकली आहे. माहेरी सोडण्यासाठी मदतीचे आश्वासन देऊन एका महिलेवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी अमानुष बलात्कार करणाऱ्यांनी माणुसकीलाच काळीमा फासला आहे. अत्याचारामुळे अतिरक्तस्त्राव झालेल्या या महिलेला आता पाच शस्त्रक्रियांना सामोरं जावं लागणार आहे. सामूहिक बलात्कार आणि पाच शस्त्रक्रिया यांमुळे तिच्या शरीर-मनाची काय अवस्था असेल, याची कल्पनाही करवत नाही. नसल्याच ठाकरे यांनी सांगीतल.

बलात्कार रोखण्यासाठी तसंच बलात्कार करणाऱ्यांना 'तत्काळ फाशी देण्यासाठी राज्य सरकारने आता तरी त्वरित पावले उचलावीत'. मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा, मुख्यमंत्र्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याची प्रथा राज्यातील महिलांना मोडावीच लागेल. असा इशारा ही त्यांनी दिला आहे.

Updated : 5 Aug 2022 8:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top