Home > News > या चित्रपटातील काम पाहून शबाना आझमीच्या आईने त्यांची केली होती खरडपट्टी..

या चित्रपटातील काम पाहून शबाना आझमीच्या आईने त्यांची केली होती खरडपट्टी..

या चित्रपटातील काम पाहून शबाना आझमीच्या आईने त्यांची केली होती खरडपट्टी..
X

मातृत्व हे अनादिकालापासून विचारवंत -तत्वज्ञ साहित्यिकांना प्रेरित करणारे एक सनातन गूढ आहे. जगाच्या सांस्कृतिक इतिहासात 'मातृत्व ' ही सर्वात गौरवशाली संकल्पना आहे व एक सुवर्ण मानक 'द

ओल्डेस्ट लव्ह स्टोरी' मानली गेली आहे. पण या संकल्पनेचा वास्तवदर्शी आलेख काही वेगळेच सत्य सांगताना दिसतो. या विरोधाभासाचे आयाम व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिका, समीक्षक, लघुपटदिग्दर्शक रिंकी रॉय भट्टाचार्य आणि पत्रकार मैथिली राव यांनी संपादन केलेल्या 'द ओल्डेस्ट लव्ह स्टोरी या लेखसंग्रहाचे प्रकाशन काल बांद्रा येथे पार पडले.


अभिनेत्री शबाना आझमी यांच्या हस्ते या संपादित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. शबाना आझमी या मागील काही काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहेत. पण जेव्हा आई आईबद्दल काही बोलायचं असतं किंवा आईसोबत घालवलेल्या आठवणींबद्दल सांगायचं असतं, तेव्हा शबाना आझमी तो क्षण खूप सुंदर असल्याचं मानतात. या संपादित केलेल्या पुस्तकात शबाना आझमी यांचा सुद्धा एक लेख आहे. या पुस्तकात शबाना आझमी यांनी त्यांच्या आईसोबतच्या नातेसंबंधातील दुर्मीळ किस्से सांगितले आहेत.




या प्रकाशन सोहळ्यात बोलताना शबाना आझमी यांनी त्यांच्या आई शौकत आझमी यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी संगीतल्या. त्यांच्या आईविषयी सांगताना त्या म्हणतात की, ती एक अतिशय चांगली स्त्री होती, एक आई आणि पत्नी होती. तिची सर्वात मोठी खासियत ही होती म्हणजे, तिने तिच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये समान संतुलन ठेवले आणि हे मी नेहमीच तिच्याकडून शिकले आहे. पण ती निरुपा रॉय टाईप बॉलीवूडची आई नव्हती. ती खूप कठोर आणि निर्दोषपणे आपला दृष्टिकोन ठेवायची. तीने कधी एखाद्याला जमिनीवर उतरवेल असेल हे मलाही कळलं नाही.'



त्या पुढे म्हणाल्या की, 'ही एक त्या वेळी घडलेली गोष्ट आहे. माझा पहिला चित्रपट 'अंकुर' प्रदर्शित झाला आणि माझी आई माझ्या पुढे रांगेत बसली होती. चित्रपट पाहताना ती मला म्हणाली की, तू खूप चांगली अभिनेत्री आहेस, मला तुझा अभिमान आहे, हा चित्रपट खूप चांगला आहे. माझ्या शेजारी असलेल्या लोकांना हे पाहून काय चाललं आहे, असा प्रश्न त्यांना पडला असेल. आईचं बोलणं ऐकून माझा खूप आत्मविश्वास वाढला.




'मग माझा दुसरा चित्रपट 'फासला' दोन महिन्यांनी आला, तेव्हा ती म्हणाली की शबाना, हा इतका मूर्खपणाचा चित्रपट आहे आणि तू असा मूर्खासारखं काम केलं आहेस. जर तू मला हा चित्रपट आधी दाखवला असतास तर, मी तुझं लग्न एखाद्या लंगड्या-लुळ्याशी करून दिलं असतं. पण चित्रपटसृष्टीत प्रवेश करू दिला नसता. इतकंच नाही तर, शबाना आझमी यांनी या पुस्तकात सांगितलं आहे की, वयाच्या 9 व्या वर्षी त्या त्यांची आई शौकत आझमी यांच्याशी अतिशय उद्धटपणे वागत होत्या. त्या म्हणतात, 'एक काळ असा होता की मी अनेकदा खूप उद्धटपणे वागायचे. मग एकदा माझ्या आईने मला कॉल केला आणि म्हणाली की, तू असं का वागतीयेस? मग मी तिला म्हणाले की, मला वाटतं की, तुझं माझ्यापेक्षा बाबा म्हणजे भावावर जास्त प्रेम करते. मग ती मला म्हणाली की बघ, मी तुझी आई आहे पण एक माणूसही आहे. तुझा स्वभाव खूप उद्धट आणि अप्रिय आहे आणि मला हे सर्व आवडत नाही आणि तुझा भाऊ खूप प्रेमळ, चांगल्या स्वभावाचा आहे. म्हणूनच, मी त्याच्याशी चांगलं वागते. शबाना आजमी यांनी यावेळी आजच्या पालकांना एक सूचना दवखील केली त्या म्हणाल्या, ज्यांची मुलं पालकांशी अतिशय उद्धटपणे वागतात, त्यांनी फक्त शौकत आझमींना फॉलो करा. असे आईविषयीचे अनेक किस्से यावेळी सांगितले...

Updated : 5 Jun 2022 10:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top