Home > News > Pune ; महिला डॉक्टर सोबत घडला सेक्सटॉर्शन प्रकार

Pune ; महिला डॉक्टर सोबत घडला सेक्सटॉर्शन प्रकार

Pune ; महिला डॉक्टर सोबत घडला सेक्सटॉर्शन प्रकार
X

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील वाकडमध्ये एका डॉक्टर महिले सोबतच सेक्सटॉर्शनचा प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यक्तीने डॉक्टर महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवून सदर डॉक्टर महिलेला ब्लॅकमेल करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

संबंधित महिला डॉक्टरने याबाबतची तक्रार वाकड पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे. या महिला डॉक्टरने गुजरात येथे राहणाऱ्या प्रणव अरविंद पांचाळ या 36 वर्षीय व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवला आहे. प्रणव पांचाळ हा गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातील अटलादरा गावाचा रहिवासी आहे. 2 मार्च 2020 ते 8 ऑक्टोबर 2021 दरम्यान वेळोवेळी फिर्यादी डॉक्टर महिलेसोबत व्हिडिओ कॉलवर संभाषण करत होता.या दरम्यान महिला डॉक्टरचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ या आरोपीने मिळवले होते. दरम्यान आरोपी प्रणव पांचाळने डॉक्टर महिलेच्या पतीच्या मोबाईलवर संबंधित व्हिडिओ आणि फोटो पाठवले होते. त्याचे आधारे हा आरोपी महिला डॉक्टरला ब्लॅकमेल करत होता,दरम्यान संबंधित महिलेने आरोपीच्या जाचास कंटाळून वाकड पोलिसांत गुन्हा दाखल केला , वाकड पोलिसांनी आयटी ॲक्ट तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

Updated : 10 Oct 2021 12:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top