Home > News > अभिनेत्री कंगना राणावतला सत्र न्यायालयाचा तडाखा; तक्रार इतरत्र वर्ग करण्यास नकार

अभिनेत्री कंगना राणावतला सत्र न्यायालयाचा तडाखा; तक्रार इतरत्र वर्ग करण्यास नकार

अभिनेत्री कंगना राणावतला सत्र न्यायालयाचा तडाखा; तक्रार इतरत्र वर्ग करण्यास नकार
X

अभिनेत्री कंगना राणावतला सत्र न्यायालयाने तडाखा दिला आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेली मानहानीची तक्रार अन्य महानगरदंडाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याची अभिनेत्री कंगना राणावतची मागणी मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांनी फेटाळली होती. सत्र न्यायालयानेही हा निर्णय शुक्रवारी योग्य ठरवला आहे.

आपल्याला या न्यायालयावर विश्वास नसल्याचा आरोप करत कंगना राणावतने अख्तर यांची तक्रार अंधेरी येथील महानगरदंडाधिकाऱ्यांकडून अन्य महानगरदंडाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. अख्तर हे बॉलिवूडमधील खंडणीखोर आहे, असा आरोप करत त्यांच्याविरोधात कंगनाने प्रतितक्रार केली होती. ही तक्रार देखील अन्य महानगरदंडाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याची मागणी कंगनाने केली होती. मात्र मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांनी कंगनाची मागणी फेटाळली होती. या निर्णयाविरोधात कंगनाने सत्र न्यायालयात धाव घेतली होती.मात्र, तिथेही कंगणाना तडाखाच मिळाला आहे.

Updated : 1 Jan 2022 5:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top