Home > News > पुन्हा चित्रा वाघ गोत्यात, महेबुब शेख प्रकरणाला वेगळे वळण

पुन्हा चित्रा वाघ गोत्यात, महेबुब शेख प्रकरणाला वेगळे वळण

मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या पीडित मुलीने महेबुब शेख यांच्या विरोधात खोटी तक्रार द्यायला लावली व या सगळ्या प्रकरणात आष्ठीचे आमदार सुरेश धस व चित्रा वाघ यांचा सहभाग आल्याच धक्कादायक आरोप केला आहे..

पुन्हा चित्रा वाघ गोत्यात, महेबुब शेख प्रकरणाला वेगळे वळण
X

चित्रा वाघ आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्या विरोधात औरंगाबादच्या जीन्सी पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबुब शेख यांच्या विरोधात बलात्काराचे आरोप करणाऱ्या पीडित मुलीने तक्रार दाखल केल्यानंतर आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. दोन वर्षांपुर्वी महेबुब शेख यांच्यावर दाखल झालेला बलात्काराच्या गुन्हा खोटा असून मालेगावचे नगरसेवक नदिमोद्दीन शेख उर्फ नदिम पिटर याने माझ्यावर अत्याचार करुन महेबुब शेख यांच्या विरोधात खोटी तक्रार द्यायला लावली. त्यात आष्ठीचे भाजप आमदार सुरेश धस व नेत्या चित्रा वाघ यांचा सहभाग होता, असे खळबळजनक आरोप 30 वर्षीय पिडितेने केला आहे. त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.

या सर्व प्रकारानंतर मेहबूब शेख यांनी म्हंटल आहे की, माझ्यावर गुन्हा दाखल केलेल्या मुलीने आज फिर्याद देऊन माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपाचे २ नेत्यानी प्रवृत्त केले ते सांगीतल्याचे मला पत्राकार बांधवाकडुन कळल. मला FIR कॅापी मिळाली नाही मला FIR कॅापी मिळाली तर मी सविस्तर बोलले पण मी पहिल्या दिवसापासुन सांगत होतो डोळ्यात पाणी आणुन सांगितले आणी नियतीने सत्य समोर आणले उसके घर मै देर है अंधेर नाही। सत्य परेशान हो सकता है पराजीत नाही

जे कुणी नेते सहभागी असतील त्यांच्यासह महेबुब शेख कायदेशीर कार्यवाही केल्या शिवाय राहणार नाही. अस म्हंटल आहे.

या सगळ्या प्रकरणावर चित्रा वाघ यांनी काय म्हंटल आहे.

या प्रकरणावर चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ ट्विटर वर शेअर केला आहे त्यांनी म्हंटल आहे की, "राजकारणात काम करताना अशा घटना किंवा अनुभव नवीन नाहीत. आम्ही त्या मुलीला पहिल्या दिवसापासून मदतच केली आहे. आम्हाला जिथे-जिथे तपास यंत्रणा बोलवतील तिथे आम्ही जावू आणि सहकार्य करु. असे काही अनुभव येतात म्हणून आम्ही काम करणं सोडत नाहीत. आम्ही काम करतच राहू. आम्हाला पूर्ण कल्पना आहे, ज्या ठिकाणी अशी राजकीय धींड येतात त्या ठिकाणी अशा अडचणी उद्भवणं स्वाभाविक आहे. त्यामुळे अशा अडचणींना सामोरे जाण्यास आमची तयारी आहे",

Updated : 19 Jun 2022 2:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top