Home > News > संवेदनशील आणि सर्जनशील अशा नवीन लेखकांना लिहितं करण्यासाठी ...

संवेदनशील आणि सर्जनशील अशा नवीन लेखकांना लिहितं करण्यासाठी ...

संवेदनशील आणि सर्जनशील अशा नवीन लेखकांना लिहितं करण्यासाठी ...
X

मागील १४ वर्षांपासून 'मिळून साऱ्याजणी' आणि का.स.वाणी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त सहकार्याने 'रेऊ कथा स्पर्धा' घेतली जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांना लिहीण्याची आवड आहे अशा संवेदनशील आणि सर्जनशील लेखांनी आपली नावं नोंदवावीत असं आवाहन 'मिळून साऱ्याजणी' आणि का.स.वाणी प्रतिष्ठान यांनी केलं आहे.

स्पर्धेचे नियम व अटी...

* कथा पूर्णपणे स्वतंत्र हवी. कथा जास्तीत जास्त ३००० शब्दापर्यंत असावी.

* स्पर्धेसाठी कथेची मूळ प्रत पाठवावी.

* कथा ईमेलनेही पाठवता येईल. शक्यतो युनिकोडमध्ये टाईप करून पाठवावी. ईमेल - saryajani@gmail.com

* बक्षिसपात्र कथा 'मिळून साऱ्याजणी' मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील, या कथांना वेगळे मानधन मिळणार नाही.

* कथेच्या सुरूवातीच्या पानावर स्वतःचे नाव, पत्ता व दूरध्वनी किंवा मोबाईल क्रमांक लिहावा.

* कथा १५ सप्टेंबर २०१९ पर्यंत आमच्याकडे पोचाव्यात.

* पाकिटावर 'रेऊ कथा स्पर्धा' हा उल्लेख करावा.

* स्पर्धेचा निकाल 'मिळून साऱ्याजणी' जानेवारी २०२० च्या अंकात जाहीर केला जाईल.

कथा पाठवण्याचा पत्ता : 'मिळून साऱ्याजणी' , ४०/१ ब, भोंडे कॉलनी, कर्वे रस्ता, पुणे ४११००४

फोन नं. - ०२० २५४३३२०७

मोबाईल नं. 9423080224

saryajani@gmail.com

Updated : 8 July 2020 3:36 AM GMT
Next Story
Share it
Top