Home > News > वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने मागितला लाखाचा हप्ता, लाचलुचपत विभागाने केली अटक

वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने मागितला लाखाचा हप्ता, लाचलुचपत विभागाने केली अटक

वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने मागितला लाखाचा हप्ता, लाचलुचपत विभागाने केली अटक
X

कोरोनाच संकट सर्वत्र असताना अशा काळातही लाचखोर शासकीय बाबू काही सुधरत नाही. लाचखोरीत पुरुषांप्रमाणेच महिला अधिकारी सुद्धा मागे राहिल्या नाहीत. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील उपविभागीय अधिकारी मनिषा राशिनकर यांच्यासह एका जणाला लाचलुचपत विभागाने मंगळवारी अटक केली. परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील वाळू वाहतूक करणाऱ्या विक्रेत्याकडे वाळूचा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली होती. ज्यात एक लाख 10 हजार रुपयांची दरमहा हप्तारुपी लाच घेताना त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनिषा राशीनकर यांच्यासह कोतवाल विलास नरसिंग जानकर याला 1 लाख 10 हजाराच्या लाच प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आपल्या हद्दीत वाळू व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दरमहा लाच मागितल्याचा आरोप आहे. 1 लाख 10 हजार रुपयांची मागणी करून तडजोडी अंती 90 हजार आणि 20 हजार आरोपी जानकरने स्वीकारले.

एका महिला अधिकाऱ्याला लाखो रुपयांची लाच मागीतील्या प्रकरणी अटक करण्यात आल्याने उस्मानाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच याप्रकरणी पोलीस ठाणे भुम येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्रभर चालू होती.

Updated : 28 July 2021 3:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top