Home > News > 100 स्मार्ट सिटीज आठवतायत? असा सवाल विचारत सुचेता दलाल यांची केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका!

100 स्मार्ट सिटीज आठवतायत? असा सवाल विचारत सुचेता दलाल यांची केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका!

100 स्मार्ट सिटीज आठवतायत? असा सवाल विचारत सुचेता दलाल यांची केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका!
X

नव्या वर्षाचा अर्थसंकल्प Union Budget 2022 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पावर टीका करताना ज्येष्ठ अर्थपत्रकार सुचेता दलाल यांनी १०० स्मार्ट सिटी आठवत आहेत का? असा प्रश्न विचारला.


मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी देशाचा नव्या वर्षातील अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक नवनव्या योजनांची आणि त्यासाठी लागणाऱ्या मोठ मोठ्या किंमतींची घोषणा त्यांनी केली. त्यांच्या या अर्थसंकल्पीय भाषणावर ज्येष्ठ अर्थ पत्रकार सुचेता दलाल यांनी ट्विटरवर ट्विट करत टीका केली आहे. या ट्विट मध्ये त्यांनी १०० स्मार्ट सिटी प्रकल्प तसेच १०० लाख कोटींच्या इंफ्रास्ट्रक्चर योजना आठवत आहेत का असा सवाल विचारत ही टीका केली आहे.

त्या त्यांच्या ट्विट मध्ये म्हणतात, "कोरोनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर गेल्या दोन वर्षात फार मोठा परिणाम झाला आहे. पण हा अर्थसंकल्प अशा मोठमोठ्या योजना आणि प्रकल्पांवर लक्ष्य केंद्रीत करतो ज्या भविष्यात बूडणार आहेत. कुणाला १०० स्मार्ट सिटीज आठवत आहेत का? ही योजना यशस्वी ठरली असती तर गेल्या ७ वर्षात एक तरी स्मार्ट सिटी उभी राहिली असती.", अशी टीका त्यांनी केली.

याशिवाय त्या म्हणतात, "निर्मला सीतारामनजी आपण ज्या पध्दतीने मोठमोठ्या आकड्यांच्य़ा घोषणा करत आहात त्याच पध्दतीने गेल्या सात वर्षातील अशाच मोठ्या आकड्यांवर आपण का नाही बोलत आहात? १०० लाख कोटींचा इंफ्रास्ट्रक्चर प्लॅन कूणाला आठवतोय?", अशा शेलक्या शब्दात त्यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

Updated : 1 Feb 2022 10:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top