Home > News > दीपिका पदुकोणचा फोटो पाहताच अण्णा हजारे म्हणाले…

दीपिका पदुकोणचा फोटो पाहताच अण्णा हजारे म्हणाले…

दीपिका पदुकोणचा फोटो पाहताच अण्णा हजारे म्हणाले…
X

ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णा हजारे आज जवळपास 85 वर्षेचे आहेत. पण या वयात देखील त्यांचं समाजकार्य अविरतपणे सुरू आहे. अण्णांनी राळेगणसिद्धी या गावाचा कायापालट कसा केला हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले अण्णा काही काळ लष्करी सेवेत काम केल्यानंतर गावी परत आले. आल्यानंतर त्यांनी ग्रामविकासाच्या कामांना सुरुवात केली. आणि एका दुष्काळी गावचे नंदनवन केले. काही वर्षांपूर्वी अण्णा हजारे 'द कपिल शर्मा शो' या कॉमेडी शोमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्या कार्यक्रमात अनेक मजेशीर किस्से घडले. त्यातलाच एक मजेशीर किस्सा म्हणजे निवेदकाने जेव्हा अण्णा हजारेंना दीपिका पदुकोण या अभिनेत्रीचा फोटो दाखवला आणि या दिसायला खूप सुंदर आहेत ना? असा प्रश्न केला त्यावेळी अण्णांनी दिलेले उत्तर हे अत्यंत मजेशीर होतं अण्णांनी नक्की काय उत्तर दिलं होतं पाहूया..

तर झालं असं होतं की, निवेदक कपिल शर्मा यांनी स्क्रीनवर दीपिका पादुकोण यांचा फोटो दाखवला आणि या अभिनेत्री दीपिका पादुकोण आहेत असं सांगितलं व त्या दिसायला सुख सुंदर आहेत ना? असा प्रश्न करताच अण्णा हसले आणि त्यांनी फक्त मान हलवली. अण्णांचा हा व्हिडीओ अनेक वर्षानंतर आता समाजमाध्यमांवर पुन्हा व्हायरल होतो आहे. या कार्यक्रमादरम्यान त्यांना तुमची आवडती अभिनेत्री कोण आहे? असा देखील प्रश्न करण्यात आला. यावर अण्णा म्हणाले की, अभिनेत्रींचे मी फक्त काम पाहतो. त्यांचे हावभाव त्यांचा अभिनय मला आवडायचे. त्यात दिसायला कशा आहेत हे मला आवडत नव्हतं.. पण त्यांचं काम कसे आहे हे मी पाहायचो. असं म्हटल्यानंतर संपूर्ण सेटवर एकच हशा पिकला...

आण्णा हजारे लष्करी सेवेत असताना दारू सुद्धा पीत होते तो काय किस्सा आहे पहा..

गावचा विकास करताना अण्णा हारारेंनी सुरुवातीला काय काम केलं असेल तर ते होतं गावातील दारूबंदीचे. कारण अण्णांना माहीत होतं दारूबंदी केल्याशिवाय गावचा विकास होणार नाही. पण तुम्हाला एक गोष्ट ठाऊक आहे का की, अण्णा जेव्हा लष्करी सेवेत होते त्यावेळी सुरुवातीला अण्णांनी सुद्धा दारू पिली होती. आता ही गोष्ट ऐकून तुम्हाला थोडा धक्का बसला असेल. तर याच कार्यक्रमात निवेदकाने तुम्ही लष्करी सेवेत काम करत होता त्यावेळी कधी दारू पिऊन पाहिली आहे का? असा प्रश्न विचारला. यावर अण्णांनी हसत हसत उत्तर दिलं की, ज्यावेळी मी बर्फात गेलो होतो त्यावेळी सुरुवातीला मी दोन पेग रम पीत होतो. आता तुम्ही म्हणाल की अण्णा हजारे दारू पितात का? तर अजिबात नाही..

तुम्हाला सर्वांनाच माहित असेल की अण्णा हे सुरुवातीला लष्करी सेवेत होते. 1960 मध्ये लष्करात ट्रक चालक म्हणून त्यांनी काम पाहिलं व त्यानंतर त्यांच्या 15 वर्ष

लष्करी सेवेत कार्य बजावले. त्यावेळी घडलेला हा किस्सा आहे. अण्णा म्हणतात की, बर्फाळ प्रदेशात लष्करी सेवा बजावत असताना सुरवातीला मी दोन पेग पीत होतो. पण जेव्हा स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक वाचले त्यावेळी मला जीवन लक्षात आले. खाणं-पिणं आणि मरून जाणे एवढं करण्यासाठीच जीवन नाही. त्या ठिकाणी फ्री रम मिळत होती पण मी कधीही हात लावला नाही. प्रत्येक जेवणाला दोन बॉटल रम दिली जाते. पण मी कधीही घेण्यासाठी गेलो नसल्याचं अण्णा म्हणाले.

Updated : 18 Jun 2022 3:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top