आजींचा स्मॅश पाहून प्रतिस्पर्धी सुद्धा झाला गारद..
X
वय जसजसं वाढत जाईल तसतसं माणूस थकत जातो असं म्हटलं जातं तर दुसरीकडे वय हा फक्त एक आकडा आहे, असं सुद्धा म्हटलं जातं. पण कोण काय म्हणतो हे फार महत्त्वाचं आहे. कोणी आपलं वय वाढलं की, मी थकलो आहे असं म्हणत अंथरुणाला खिळून बसतो तर काहीजण आपलं वय कितीही वाढलं तरी त्याला फक्त एक आकडा समजतात. वाढलेले वय ही जर कमजोरी न समजता त्याला फक्त एक आकडा समजला तर काय होऊ शकत याची काही कल्पना आहे का? तर मग हे पहाच..
आता तुम्ही वरती फोटो मध्ये ज्या आजी पाहत आहात त्यांनी आपल्या वयाची सत्तरी पार केली आहे. आता तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या आसपासचे सत्तरी पार केलेले लोक आले असतील. मग हातात काठी, डोळ्याला मोठा चेस्मा, थरथरणारे हात आणि वळलेली बोबडी असे लोक तुमच्या डोळ्यासमोर येत असतील. तुम्ही जो विचार करत आहात तो ठीक आहे. पण या आजींचा विषय थोडा वेगळा आहे.
या आजींचा एक टेबल टेनिस खेळताना चा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत आजी असल्या खतरनाक टेबल टेनिस खेळत आहेत की पुढच्या प्रतिस्पर्ध्याला त्यांनी लागवलेला स्मॅश पाहून आजींना रोखणं महाकठीण झाले आहे. आता या आजी नक्की आहेत तरी कोण? तर एकेकाळी टेबल टेनिसचे हेच मैदान गाजवणाऱ्या या सरस्वती रॉय आहेत. त्यांचं वय वर्ष आज सत्तरहून अधिक आहे. पण या वयात देखील त्यांची खेळाविषयी असलेली आवड व फिटनेस पाहून अनेकांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली आहेत.
आजींचा हाच व्हिडिओ पाहून तुम्हाला समजले असेल की, अनेकांना वाढलेलं वय म्हणजे आजारपण, दवाखाना असं कंटाळवाण वाटतं पण आजींना वय हा फक्त एक आकडा आहे...