Home > News > राज्यातील शाळा नियोजित वेळेत सुरू होणार का? वर्षा गायकवाड यांनी केलं स्पष्ट..

राज्यातील शाळा नियोजित वेळेत सुरू होणार का? वर्षा गायकवाड यांनी केलं स्पष्ट..

राज्यातील शाळा नियोजित वेळेत सुरू होणार का? वर्षा गायकवाड यांनी केलं स्पष्ट..
X

राज्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा तोंड वर काढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. त्यामुळे सर्व पालकांमध्ये शाळा प्रत्यक्षात सुरू होणार की नाही? असे अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर शाळा या नियोजित वेळेनुसारच सुरू करण्यात येतील. यासंदर्भात सल्लागार मंडळाशी चर्चा करून शाळांना कशी काळजी घ्यावी याबाबत सूचना देण्यात येतील. असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल रविवार स्पष्ट केलं आहे..

मागील दोन वर्षांपासून देशावर करणाचे संकट आहे. या कोणाच्या संकटात दोन वर्ष शाळा या ऑनलाइन पद्धतीने सुरू होत्या. त्यानंतर कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे शाळा प्रत्यक्ष सुरू करण्यात आल्या आहेत. पण आता नवीन शैक्षणिक वर्षाच्या तोंडावर पुन्हा राज्यात कोरोनाच्या संख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने या संदर्भात नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना सुद्धा दिल्या आहेत. मागच्या काही दिवसांमध्ये पाहिलं तर अनेक राजकीय नेते असतील तसेच दिग्गज कलाकार असतील यांना देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाची संख्या वाढू लागल्यामुळे या वर्षी राज्यातील शाळांबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे पालकांचे लक्ष होते. तर राज्यातील शाळा नियोजित वेळेनुसारच सुरू होतील असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

Updated : 6 Jun 2022 5:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top