Latest News
Home > News > उद्यापासून शाळा सुरू होणार

उद्यापासून शाळा सुरू होणार

उद्यापासून शाळा सुरू होणार
X

कोरोना महामारी काळात बंद झालेल्या शाळा सोमवारपासून सुरू होणार असून आरोग्याच्या दृष्टीने सर्व काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

उद्यापासून राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा सुरु होत आहे.शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. मुलांमध्ये थोडेही लक्षणं आढळल्यास चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास ज्या वर्गातील विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला तो वर्ग बंद ठेवावा अशी सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.ते जालन्यात बोलत होते. लोकल सर्कल कम्युनिटी प्लँटफॉर्मनं एक सर्वेक्षण केलं असून या सर्वेक्षनात 62 टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिल्याचं समोर आलंय.यावर बोलताना पालकांनी काळजी करण्याचं कारण नसून जगभरातील शाळांचा अभ्यास करूनच राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये असाही शाळा सुरू करण्याचा हेतू असल्याचं ते म्हणाले.त्यामुळे पालकांनी काळजी न करता नियम पाळावे असं आवाहन देखील टोपे यांनी केलं.लोकांनी नियम पाळल्यास राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येईल आणि राज्यात लागू केलेले निर्बंध मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून कमी करण्यात येतील.असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.राज्यात लस घेणं सक्तीचं नाही मात्र नागरिकांच्या आरोग्यासाठी लस घेणं त्यांना भाग पाडू असं सांगत सध्या लता मंगेशकर यांची तब्बेत स्थिर असल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली.

Updated : 23 Jan 2022 9:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top