Home > News > खास मुलींसाठी 30 हजार रुपयांची शिष्यवृत्ती...ती कोणाला मिळू शकते वाचा...

खास मुलींसाठी 30 हजार रुपयांची शिष्यवृत्ती...ती कोणाला मिळू शकते वाचा...

पैशाअभावी शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलींसाठी सॅंडविक कोरोमंटची ही खास शिष्यवृत्ती...

खास मुलींसाठी 30 हजार रुपयांची शिष्यवृत्ती...ती कोणाला मिळू शकते वाचा...
X

सॅंडविक कोरोमंट मार्फत मुलींसाठी आता विशेष शिष्यवृत्ती कायम कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ही शिष्यवृत्ती खास मुलींसाठी तयार करण्यात आली आहे. मुलींना शिक्षण घेताना ज्या अनेक समस्या येतात त्यातील सर्वात महत्त्वाची समस्या असते ती म्हणजे शिक्षणासाठी लागणारे पैसे. शाळा किंवा कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे अनेक मुलींना शिक्षणापासून वंचित रहावे लागते. तर अशा पैसे नसल्यामुळे शिक्षणापासून वाचून वंचित राहणाऱ्या मुलींना आता दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सॅंडविक कोरोमंट गर्ल्स शिष्यवृत्ती हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ही शिष्यवृत्ती सॅंडविक एशिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलींसाठी असणार आहे.

या शिष्यवृत्तीची रक्कम ही तीस हजार रुपये आहे.

या शिष्यवृत्तीचे पात्रता निकष काय असणार आहेत?

एआयसीटीई/एनएएसी/यूजीसी/सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थांमधून पूर्णवेळ डिप्लोमा कोर्सचे शिक्षण घेणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांना 10 वीच्या परीक्षेत किमान 50% गुण असणे गरजेचे आहे.

फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थीनी या शिष्यवृत्ती करिता अर्ज करू शकतात.

शिष्यवृत्ती फक्त त्या विद्यार्थीनीसाठी उपलब्ध आहे ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 80, 000 पेक्षा कमी आहे.

या ठिकाणी अर्ज करत असताना तुम्हाला काही आवश्यक कागदपत्र सुद्धा लागणार आहेत.

आवश्यक कागदपत्र

जी मुलगी अर्ज करणार आहे तिचा फोटो

ओळखीचा पुरावा

पत्त्याचा पुरावा

उत्पन्नाचा पुरावा

विद्यार्थी बँक पासबुक/कियोस्क

10 वी मार्कशीट

चालू वर्षाची फी पावती/फी रचना

संस्थेचे प्रवेश पत्र / बोनाफाईड प्रमाणपत्र

मागील शैक्षणिक वर्षाचे मार्कलिस्ट (प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थी वगळता)

अधिवास प्रमाणपत्र

यासाठी या शिष्यवृत्तीसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता.

Updated : 8 Sep 2021 5:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top