Home > News > IAS सौम्या शर्मा : ऐकण्याची शक्ती गमावली, तीव्र तापात पण IAS ची परीक्षा देऊन यशस्वी झाली

IAS सौम्या शर्मा : ऐकण्याची शक्ती गमावली, तीव्र तापात पण IAS ची परीक्षा देऊन यशस्वी झाली

IAS सौम्या शर्मा यांचा सौम्या शर्मा पासून IAS सौम्या शर्मा बनण्या पर्यंतचा प्रवास फारच कठीण आहे. अनेक संकटांना हे सामोरे गेले त्यांच्या यशस्वी होण्याची कहाणी नक्कीच सगळ्यांना आणि यूपीएससी च्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरू शकते. नक्कीच त्यांच्या आयुष्यातला ब्रीदवाक्य लाइफ मस्ट गो ऑन हेच असणार, जाणून घेऊयात नक्की काय आहे त्यांचा जीवन प्रवास.

IAS सौम्या शर्मा : ऐकण्याची शक्ती गमावली, तीव्र तापात पण IAS ची परीक्षा देऊन यशस्वी झाली
X

IAS सौम्या शर्मा यांचा सौम्या शर्मा पासून IAS सौम्या शर्मा बनण्या पर्यंतचा प्रवास फारच कठीण आहे. यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणून ओळखली जाते. अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असत त्यानी यूपीएससी परीक्षा द्यावी अधिकारी व्हाव. यूपीएससी ची परीक्षा देत असताना अत्यंत मेहनत करून संघर्षमय प्रवास करत अनेकजण आपली स्वप्न पूर्ण करत असतो. त्या पैकीच एक IAS सौम्या शर्मा, यांनी त्यांच्या आयुष्य अत्यंत संघर्षात घालवल. त्या अनेक संकटांना हे सामोरे गेले त्यांच्या यशस्वी होण्याची कहाणी नक्कीच सगळ्यांना आणि यूपीएससी च्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरू शकते. त्यांच्या आयुष्यातला ब्रीदवाक्य लाइफ मस्ट गो ऑन हेच असणार.

IAS सौम्या शर्मा या दिल्लीत राहणाऱ्या असून त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण केल्या नंतर त्यांनी दिल्लीतील नॅशनल लॉ स्कूलमधून कायद्याचे शिक्षण घेतले. कायद्याच शिक्षण घेण्याच्या शेवटच्या वर्षाला सौम्या शर्माने यांनी यूपीएससी परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. सौम्य शर्माला लहान वयातच त्यांच्या सोबत दुर्घटना घडली. वयाच्या 16 व्या वर्षी IAS सौम्या शर्मा यांची श्रवणशक्ती अचानक गेली. सौम्याच्या उपचारासाठी अनेक उपाय करण्यात आले. उपचार करताना 90 ते 95 टक्के ऐकण्याची क्षमता कमी झाली. सौम्याच्या उपचारासाठी त्यांच्या आई-वडिलांनी अनेक उपाय गेले पण त्याचा काहीसा फायदा झाला नाही. त्यांची आयुष्याची वाटचाल पूर्ण पणे बदलून गेली असे असूनही त्यांनी आयुष्यात कधीही हार मानली नाही आणि नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. लढवय्याप्रमाणे जगून त्यांनी या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न केला आणि आता त्या श्रवणयंत्राच्या मदतीने ऐकतात.

२०१७ मध्ये झालेल्या UPSC परीक्षेत IAS सौम्या शर्माने 9वा क्रमांक मिळविला होता. त्यांनी या परीक्षेत अतिशय उत्कृष्ट गुण मिळवले त्यांची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल हि झाली होती. केवळ ४ महिन्या पूर्वी तयारी करूनही IAS सौम्या शर्मा यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. खरतर त्यांनी कायद्याच्या शेवटच्या वर्षातच परीक्षा देण्याचे ठरवले.

यूपीएससी मुख्य परीक्षेच्या काही दिवसांपूर्वी सौम्या शर्माची प्रकृती बिघडली होती. त्यांना 102 ते 104 अंशांपर्यंत ताप होता. असल्या अवस्थेतही त्यांनी हार ना मानता बेशुद्धावस्थेतही परीक्षा दिली. परीक्षेच्या मध्यंतरामध्ये त्यांना ड्रिप लावावे लागले होते. इतका सगळं होऊनही त्यांनी देशात ९ व क्रमांक मिळवला होता.

दिल्ली केडरमध्येही काम करून नंतर त्या महाराष्ट्र केडरमध्ये तैनात झाल्या. सौम्या सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर खूप ऍक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे २ लाखाहून अधिक चाहते आहेत. यूपीएससी प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण करण्यात सौम्याच्या मेहनत आणि समर्पणाचे फळ मिळाले. तर त्यांच्या इच्छाशक्ती हीच त्यांच्या यशश्वी होण्याची चावी आहे. प्रत्येक यूपीएससी च्या विद्यार्थ्यांना IAS सौम्या यांचा जीवन प्रवास प्रेरणादायी ठरेल यात काही वादच नाहीये.


Updated : 7 Feb 2023 3:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top