Latest News
Home > News > साडी स्मार्ट नाहीय का? दिल्लीच्या रेस्टॉरंट ने साडी परिधान केलेल्या महिलेला नाकारला प्रवेश

साडी स्मार्ट नाहीय का? दिल्लीच्या रेस्टॉरंट ने साडी परिधान केलेल्या महिलेला नाकारला प्रवेश

साडी स्मार्ट नाहीय का? दिल्लीच्या रेस्टॉरंट ने साडी परिधान केलेल्या महिलेला नाकारला प्रवेश
X

दिल्लीतील अन्सल प्लाझातील अकिला ACQUILA रेस्टॉरंट ने एका महिलेला प्रवेश नाकारल्याचा व्हिडीयो एका महिला पत्रकाराने पोस्ट केला आहे. या व्हिडीयो मध्ये एका महिलेला अकिला रेस्टॉरंट मध्ये प्रवेश नाकारला गेला. प्रवेश नाकारला जाण्याचं कारण एकदमच संतापजनक आहे. या महिलेने साडी परिधान केली होती, आणि साडी हे स्मार्ट कॅज्युअल्स मध्ये येत नाही असं तिथल्या व्यवस्थापनाचं म्हणणं होतं. अकिला रेस्टॉरंट मध्ये केवळ स्मार्ट कॅज्युअल्स ला परवानगी असल्याचं व्यवस्थापनाचं म्हणणं आहे.

या व्हिडीयो नंतर सोशल मिडीयावर संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत. साडी ही भारताची शान आहे आणि साडी जर स्मार्ट कॅज्युअल ( Smart casual ) नसेल तर मग कुठला ड्रेस स्मार्ट आहे असा सवाल नेटकरी उपस्थित करत आहेत. पाश्चिमात्य स्मार्ट आऊटफिट ची थट्टा ही नेटकऱ्यांनी उडवली आहे.


सौजन्य - सोशल मिडीया


नीता अंबानी ( Neeta Ambani ) यांना ही साडी आवडते. मुकेश अंबानींनी हे रेस्टॉरंट विकत घेऊन नीता अंबानींना गिफ्ट द्यावं अशी प्रतिक्रीया ही एका नेटकऱ्याने व्यक्त केली आहे.


सौजन्य - सोशल मिडीया


साडीची भुरळ

दरम्यान, साडी ची भुरळ कोणाला नाही. भारतात साडी हे लोकप्रिय परिधान आहे. २५० रूपयांपासून ५० लाखांपर्यंतच्या साड्यांची व्हरायटी भारतात उपलब्ध आहे. अनेक विदेशी लोकांनाही साडी पसंत आहे. काही सेलिब्रिटींच्या वॉल वर तुम्हाला साडी परिधान केलेले फोटो पाहायला मिळतील. फेसबुक आणि ट्वीटर वर ही वारंवार साडी वर ट्रेंड चालत असतात. या Saree Trend मधले हे काही फोटो तुम्हाला साडी चं माहात्म्य सांगून जातील.


सौजन्य - सोशल मिडीयासौजन्य - सोशल मिडीयासौजन्य - सोशल मिडीयासौजन्य - सोशल मिडीयासौजन्य - सोशल मिडीयासौजन्य - सोशल मिडीयासौजन्य - सोशल मिडीया
Updated : 2021-09-22T13:57:18+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top