Home > News > विधवा महिलांसाठी कुंकवापलिकडची संक्रांत...

विधवा महिलांसाठी कुंकवापलिकडची संक्रांत...

विधवा महिलांसाठी कुंकवापलिकडची संक्रांत...
X



कोणत्याही संस्था अथवा आणि पाठबळ न घेता उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी येथील आशा कार्यकर्तीने विधवा महिलांसाठी कुंकवापलिकडची संक्रांत हा कार्यक्रम राबवला. आणि त्याला गावातील महिलांना उदंड प्रतिसाद दिला. उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील एक विधवा व आपल्या स्वत:च्या कष्टाने कुटुंब सांभाळणाऱ्या आशा कार्यकर्ती सीमा कदम यांनी रूढी व अंधश्रध्देला फाटा देत समाजात बदल घडवण्यासाठी विधवा महिलांसांठी कुंकवापलीकडची संक्रात हा हळदी कुंकूचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला जवळपासच्या विधवा महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. आणि समाजाच्या मुख्यप्रवाहात विधवा महिलांना एक मानाचे स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न सीमा कदम यांनी केला आहे.

कुठल्याही संस्थेचे पाठबळ नसताना आशा व लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने विधवा महिलांसाठी हा हळदी-कुंकुचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला अंदाजे १५० विधवा महिला व जवळपास ३०० इतर महिला उपस्थित होत्या. यावेळी सीमा कदम यांनी उपस्थित महिलांना प्रोत्साहन देत अशा कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.

Updated : 17 Jan 2023 2:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top