Home > News > संक्रातीत हलव्याचे दागिने आणि हजारोंचा व्यवसाय तुम्हीही करू शकता

संक्रातीत हलव्याचे दागिने आणि हजारोंचा व्यवसाय तुम्हीही करू शकता

संक्रातीत हलव्याचे दागिने आणि हजारोंचा व्यवसाय तुम्हीही करू शकता
X

कोणताही सण आला कि दागिने हे हवेत ...पण संक्रातीला वापरले जाणारे खास दागिने म्हणजे हलव्याचे दागिने ... हेच दागिने संक्रात आली कि महिलांना घर बसल्या हजारो रुपयांत रोजगार देतात कसे ते पहा ...





अनेक अभिनेत्री आपले संक्रांतीचे फोटो viral करतात .आता यामध्ये काळ्या रंगाची साडी हि तर खास आहेच पण त्यासोबतच हलव्याचे दागिनेही तितकेच आकर्षक असतात. लहान मुलांची पहिली संक्रांत केली जाते त्याचबरोबर नवीन लग्न झालेल्या जोडीची सुद्धा खास संक्रांत साजरी केली जाते . त्यासाठी बाजारात अशाप्रकारचे दागिने मिळतात.पण तुम्हाला माहित आहे का या दागिन्यांची किमंत एक हजार पासून पुढे वाढत जाते. हे दागिने तिळगुळापासून बनवले जातात.







विशेष म्हणजे हे दागिने तुम्हीही घरी बनवू शकता.आणि ते कसे बनवावे याचे विडिओ सुद्धा आहेत. यावर्षी जरी तुम्ही १०००रुपयाचे दागिने खरेदी केला असलात तरी उद्या हेच दागिने तुम्ही स्वतः बनवून स्वतः व्यवसाय करू शकता . अगदी ५०० रुपया पासून या दागिन्यांची सुरुवात होते.तिळगुळापासून बनवलेले हे दागिने संक्रांतिच्या आधी आठवडाभर आणि नंतर आठवडाभर विकेल जातात. हल्ली फोटोशूटसाठी याची जास्त मागणी असते .त्यामुळे मैत्रिणींनो तुमच्या हाताचा पैसा मिळवणं कठीण नाही फक्त तसा विचार आणि कृती असली कि बस .तुम्हीही मिळवू शकाल सणासुदीला घर बसल्या स्वतःच्या उद्योगातून स्वतःची कमाई... चला तर मग करा सुरुवात .

Updated : 16 Jan 2023 1:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top