Home > News > भारत -पाकिस्तान सामान्य दिवशी सानिया मिर्झा Social media वरून होणार गायब...काय म्हंटल आहे तिने पहा..

भारत -पाकिस्तान सामान्य दिवशी सानिया मिर्झा Social media वरून होणार गायब...काय म्हंटल आहे तिने पहा..

भारत -पाकिस्तान सामान्य दिवशी सानिया मिर्झा Social media वरून होणार गायब...काय म्हंटल आहे तिने पहा..
X

24 ऑक्‍टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान हा टी-20 सामना रंगणार आहे. खरंतर क्रिकेट चाहत्यांना भारत-पाकिस्तान हा सामना फारच आवडीचा विषय आहे. संपूर्ण जगाचं लक्ष या सामन्याकडे लागलेला असतं. सध्या समाजमाध्यमांवर या सामान्यविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली असून या संदर्भात अनेक पोस्ट देखील फिरताना दिसत आहेत.

हा सामना होत असताना भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा यांनी मात्र एक मोठा निर्णय घेतला आहे. सानिया मिर्झा या पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या पत्नी आहेत. सानिया मिर्झा यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट शेअर करत 'मी ज्या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्या मधील सामना होणार आहे. त्या दिवशी सोशल मीडिया आणि Toxicity पासून दूर राहण्याच्या उद्देशाने गायब असणार आहे' असे म्हटले आहे. या व्हिडिओ सोबत त्यांनी एक कॅपशन देखील लिहिले आहे यामध्ये त्यांनी 'बाय-बाय' असे म्हंटले आहे.

Updated : 2021-10-19T11:31:32+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top